Who is Ishan Kishan Girlfriend: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यावर सर्वांच्या नजरा आहेत. कोलंबोमधील हवामान, तेथील खेळपट्टी हे सध्या चर्चेचे विषय आहेत. त्यादरम्यान इशान किशनबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ईशान किशन लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. इशान किशनच्या आजोबांनी याबाबत संकेत दिले आहेत. इशान किशनच्या गर्लफ्रेंडचं नावदेखील त्यांनी सांगितलं आहे.
कोलंबोमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, इशान किशनच्या आजोबांनी त्यांच्या नातवाच्या गर्लफ्रेंडबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. ज्यामुळे भारताच्या सलामीवीर फलंदाजाच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
खरंतर, इशान किशनचे आजोबा अनुराग पांडे यांनी त्यांच्या नातवाच्या लग्नाबद्दल आणि गर्लफ्रेंडबद्दल एएनआयशी बोलले आहेत. अनुराग पांडे म्हणाले की, ईशानने घरी सांगितलं होतं की अदितीने त्याxच्या एका मुलाखतीचं खूप कौतुक केलं होतं. आदितीने ईशानला सांगितलं होतं की त्याचे आजोबा देखणे दिसतात.
कुटुंबाने स्पष्टपणे सांगितलं की ईशान त्याच्या आयुष्यातील कोणतेही मोठे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की भविष्यात तो जिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेईल, कुटुंब त्या निर्णयाचा पूर्ण आदराने स्वीकार करेल. इशान किशनच्या लग्नाच्या प्रश्नावर अनुराग पांडे म्हणाले की, त्याच्या मोठ्या भावानेही त्याच्या मर्जीने लग्न केलं आणि कुटुंबाने त्या निर्णयाला पाठिंबा दिला. भविष्यातही घरात ही परंपरा काय असेल, जिथे मुलांच्या आनंदाला आणि त्यांच्या निवडीला प्राधान्य दिले जाईल.
कोण आहे इशान किशनची गर्लफ्रेंड?
अदितीबद्दल विचारलं असता, अनुराग पांडे यांनी उघडपणे सांगितलं की ती ईशानची गर्लफ्रेंड आहे. अदिती जयपूरची आहे आणि मॉडेल म्हणून काम करते. त्यांनी असंही सांगितलं की अदिती मिस इंडिया स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आली होती. इशान आणि अदिती हुंडिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आपण अनेकदा ऐकल्या आहेत. आता इशानच्या आजोबांनी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. अदिती हुंडिया ही मॉडेल आहे आणि ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.
इशान किशन सध्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये व्यस्त आहे. त्यानेआतापर्यंत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. अमेरिकेविरूद्ध फार मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्यानंतर इशानने नामिबियाविरूद्ध अवघ्या २४ चेंडूत ६० धावांची वादळी खेळी केली होती. आता पाकिस्तानविरूद्ध सामन्यातील त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.
