Ishan Kishan Double Century Duleep Trophy Final 2026: दुलीप ट्रॉफीमध्ये इशान किशनने दणदणीत द्विशतकी खेळी साकारली आहे. इशान किशनने २७० चेंडूत २५ चौकार व २ षटकारांसह ही वादळी खेळी साकारली आहे. ईस्ट झोनचा कर्णधार असलेल्या इशान किशनच्या या द्विशतकी खेळीने संघाला सामन्यात मजबूत स्थितीत आणलं आहे. इशान किशनचं दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील हे पहिलं द्विशतक आहे.

ईशान किशनने २०१६ मध्ये त्याचं पहिलं द्विशतक झळकावलं. हे त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिलं शतकही होतं. त्याने दिल्लीविरुद्ध २७३ धावांची खेळी केली होती. आतापर्यंत ईशान किशनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० शतकं केली आहेत. हे द्विशतक विशेष महत्त्वाचं आहे कारण दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा ‘ईस्ट झोन’चा तो पहिलाच फलंदाज ठरला.

इशान किशनने १९९ धावांवर असताना शानदार चौकार लगावत आपलं शतक पूर्ण केलं. शतकी खेळी साकारल्यानंतर त्याने हेल्मेट काढून बॅट उंचावत ड्रेसिंग रूमच्या दिशेने इशारा केला, ड्रेसिंग रूममध्येही सर्व जण उभे राहून टाळ्या वाजवत त्याचं कौतुक करत होते. दुलीप ट्रॉफी २०२६ मधील अंतिम फेरीचा सामना ईस्ट झोन आणि वेस्ट झोन यांच्यात खेळवला जात आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इशान किशनच्या नेतृत्त्वाखालील ईस्ट झोन संघाने ५५० अधिक धावांचा डोंगर उभारला आहे.

पहिल्याच दिवशी, ईस्ट झोनच्या फलंदाजांनी ३०० हून अधिक धावा उभारून आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या शानदार फलंदाजीमध्ये इशान किशनने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना कर्णधारपदाला साजेसी खेळी साकारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ईशानने अवघ्या ७१ चेंडूंत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील हे २०वं अर्धशतक होतं. या खेळीदरम्यान त्याने प्रथम श्रेणी कारकिर्दीत ४ हजार धावांचा महत्त्वपूर्ण टप्पाही गाठला.

गेल्या दोन वर्षांत, इशान किशनने महत्त्वाच्या प्रसंगी सातत्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं आणि सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी साकारत झारखंडला विजेतेपद मिळवून दिलं. आता त्याने दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही अशीच कामगिरी करून दाखवली आहे.

गेल्या दोन वर्षांत, इशान किशनने महत्त्वाच्या प्रसंगी सातत्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं आणि सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी साकारत झारखंडला विजेतेपद मिळवून दिलं. आता त्याने दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही अशीच कामगिरी करून दाखवली आहे.