एका कॅलेंडर वर्षात टी२० प्रकारात सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इशान किशनने भरारी घेतली आहे. इशानने यशस्वी जैस्वालला मागे टाकत हा विक्रम नावावर केला आहे. इशानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी२० लढतीत ३७ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार लगावले. ५ चौकारांसह टी२० प्रकारात भारतातर्फे कॅलेंडर वर्षात सर्वाधिक चौकार लगावणारा फलंदाज ठरला. आतापर्यंत हा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर होता.
२०२६ मध्ये इशानने १६७ चौकार लगावले आहेत. २०२३ मध्ये यशस्वी जैस्वालने १६५ चौकार लगावले होते. या यादीत तिसऱ्या स्थानी अभिषेक शर्मा आहे. त्याने २०२५ मध्ये १५८ चौकार लगावले होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने २०१६ मध्ये १५३ चौकार लगावले होते. यादीत पुन्हा एकदा अभिषेक शर्माचंही नाव आहे. २०१८ मध्ये शिखर धवनने १२९ चौकार लगावले होते. या यादीत आठव्या आणि नवव्या स्थानी सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत आहेत.
