Ishan Kishan RBI Assistant Manager Job Viral Photo Salary Details: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचा सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. ईशान किशन सध्या त्याच्या खेळापेक्षा एका व्हायरल फोटोमुळे अधिक चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचे काही फोटो वेगाने फिरत आहेत, ज्यामध्ये तो फॉर्मल कपडे आणि गळ्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) ओळखपत्र (ID card) घातलेला दिसत आहे. हे फोटो समोर येताच, ईशान किशन खरोखरच आरबीआयमध्ये काम करतो का, असा प्रश्न लोकांना पडू लागला. इशान किशन हा आरबीआयमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. पण त्याला ही नोकरी कशी मिळाली आणि त्याला सॅलरी किती आहे, जाणून घेऊया.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये इशान किशन पटणामधील आरबीआय (RBI) कार्यालयात दिसून येत आहे. एका फोटोमध्ये तो कार्यालयाच्या आवारात दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो एका चाहत्यासोबत सेल्फी घेताना दिसत असून, त्याच्या गळ्यात आरबीआयचे ओळखपत्र (ID card) स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोंनंतर सोशल मीडियावर असा दावा केला जाऊ लागला की, ईशान किशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘सहाय्यक व्यवस्थापक’ (Assistant Manager) या पदावर कार्यरत आहे आणि क्रिकेटच्या सामन्यांमधील मोकळ्या वेळेत तो आपली नोकरीची जबाबदारी पार पाडतो.

आरबीआयने इशानच्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या स्वरूपाबाबत कोणतीही तपशीलवार अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. दरम्यान, इशान किशननेही या प्रकरणावर कोणतेही निवेदन दिलेलं नाही. दरम्यान इशान किशनला ही नोकरी कधी मिळाली, पाहूया.

ईशान किशनला २०१७ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) नोकरी मिळाली. त्यावेळी तो भारतीय क्रिकेटमधील एक युवा खेळाडू होता आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत होता. नऊ वर्षांपूर्वीच्या ‘दैनिक भास्कर’च्या एका वृत्तानुसार, बिहारचा स्टार क्रिकेटपटू ईशान किशन याची आरबीआयच्या पाटणा कार्यालयात ‘सहाय्यक व्यवस्थापक’ (Assistant Manager) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इशानने हे पद स्वीकारलं होतं; कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी आणि कामावर रुजू होण्यासाठी तो पाटणाला गेला होता.

क्रीडा कोट्यांतर्गत त्याची आरबीआयमध्ये ‘सहाय्यक व्यवस्थापक’ (Assistant Manager) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आरबीआयमध्ये इशान किशनला जेव्हा नोकरी मिळाली तेव्हा इशान किशन १८-१९ वर्षांचा होता. अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेला इशान किशनचा RBI कार्यालयातील फोटो खरा आहे. मात्र, याचा अर्थ त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे किंवा पूर्णवेळ बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला आहे, असाही होत नाही.

इशान किशनची आरबीआय असिस्टंट मॅनेजर म्हणून किती सॅलरी आहे?

सरकारी संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक आघाडीच्या भारतीय खेळाडूंप्रमाणेच इशान किशनही आपली अधिकृत नोकरी आणि राष्ट्रीय, देशांतर्गत तसेच फ्रँचायझी क्रिकेटमधील जबाबदाऱ्या यांचा समतोल राखतो. क्रिकेटच्या कामगिरीत व्यस्त नसताना तो आपल्या अधिकृत कर्तव्यांवर हजर राहत असतो. RBI मधील या पदासाठी अंदाजे दरमहा सुमारे १ लाख ते १.४ लाख रुपयांपर्यंत एकूण वेतन मिळत असल्याचं मानलं जातं. मात्र, ईशान किशनचा नेमका पगार अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेला नाही.