२७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. या संघामध्ये सलामीवीर ईशान किशनची निवड झालेली नाही. चांगली कामगिरी करूनही संघात स्थान न मिळाल्याने ईशान किशन नाराज झाल्याचे दिसत आहे. आशिया चषकासाठी संघ निवड झाल्यानंतर त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक भावूक स्टोरी शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिया चषकासाठी केएल राहुलला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले आहे. राहुल संघात येताच ईशान किशनला संघातून वगळण्यात आले आहे. असे होताच, इन्स्टाग्राम स्टोरीवर आपला फोटो शेअर करत ईशान किशनने गाण्याच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘अब ऐसा बनना नहीं भले घायल हो जाना, तुझे मूर्ख समझे कोई, तो तू फायर हो जाना, इन सब आगे वालों की तरह ना गायब हो जाना,’ असे बोल असलेले गाणे त्याने फोटोसोबत वापरले आहे.

फोटो सौजन्य – ईशान किशन इन्स्टाग्राम

ईशान किशनला जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत १९ आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने चार अर्धशतकांसह ३०.१७ च्या सरासरीने ५४३ धावा केल्या आहेत. केएल राहुलच्या अनुपस्थितीमध्ये ईशान किशनने रोहित शर्मासोबत अनेक वेळा डावाची सुरुवात केली आहे. असे असूनही त्याला राखीव खेळाडू म्हणूनही आशिया चषकासाठीच्या संघात स्थान मिळालेले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ishan kishan share an emotional story on instagram after team india asia cup squad selection vkk
First published on: 10-08-2022 at 17:56 IST