Vaibhav Sooryavanshi Ishan Kishan Chat Revealed: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात वैभव सूर्यवंशीने वादळी शतक झळकावलं. वैभव सूर्यवंशीने पहिल्याच षटकापासून षटकारांचा पाऊस पाडायला सुरूवात केली आणि त्याने १२ षटकारांसह ३६ चेंडूत वादळी शतक पूर्ण केलं. या सामन्यानंतर इशानने वैभवला मैत्रीपूर्ण धमकी देत सांगितलं की, त्याची सर्व सीक्रेट माहिती आहेत, त्यामुळे माझ्या संघासमोर नीट खेळ. नेमकी काय चर्चा झाली होती, जाणून घेऊया.
सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवल्यानंतर त्याचा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीसोबत इशानचा एक मजेशीर संवाद झाला. किशनने त्याला हसत सांगितलं की, “मला तुझी सगळी सीक्रेट माहिती आहेत, आमच्याविरूद्ध नीट खेळ.” या हंगामात आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे सूर्यवंशी सतत चर्चेत आहे. तो तब्बल २३४.८६ च्या स्ट्राइक रेटने धावा करत आहे.
इशान किशनच्या या सांगण्यानंतरही सूर्यवंशीने हैदराबादच्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल करत धावांचा पाऊस पाडला. त्याने फक्त ३६ चेंडूत आपलं दुसरं आयपीएल शतक ठोकलं आणि राजस्थानला २२८ धावांपर्यंत मजल मारून दिली. इशानने असंही म्हटलं की, जर हा युवा फलंदाज अजून काही षटकं क्रीजवर टिकला असता, तर हा स्कोअर आणखी मोठा झाला असता.
वैभव सूर्यवंशी-इशान किशन यांच्यात नेमकं बोलणं झालं?
विजयानंतर जिओस्टारशी बोलताना ईशान किशनने वैभव सूर्यवंशीसोबत झालेल्या संवादाबद्दल सांगितलं आणि त्याची विकेट मिळवणं सनरायझर्स हैदराबादसाठी किती महत्त्वाचं होतं, हेही स्पष्ट केलं. त्याने म्हटलं की, जर सूर्यवंशी अजून काही षटकं क्रीजवर टिकला असता, तर स्कोअर सहज २५० च्या पुढे गेला असता.
इशान किशन म्हणाला, “मी त्याला फक्त सांगत होतो की तो ज्या वेड्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि ज्या प्रकारे फटके मारतोय, ते पाहून कधी कधी भीतीच वाटते की तो अजून काही वेळ खेळला असता, तर स्कोअरकार्ड कसं दिसलं असतं. म्हणूनच त्याची विकेट घेणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. स्कोअर २२८ होता, तो सहज २५८पर्यंत जाऊ शकला असता. क्रिकेटमध्ये पुनरागमन करणं खूप महत्त्वाचं असतं. आम्ही त्याला बाद करून तिथे थोडं पुनरागमन केलं.”
“मी त्याला मजेत असंही सांगितलं, ‘जेव्हा तू आमच्याविरुद्ध खेळताना संघावर थोडी दया कर. मला तुझे सगळे सीक्रेट्स आणि इनसाइड स्टोरीज माहिती आहेत,’” असं किशन म्हणाला.”
ईशान किशनने शनिवारी सनरायझर्स हैदराबादच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ३१ चेंडूत ७४ धावा करत अभिषेक शर्मासोबत १३२ धावांची शानदार भागीदारी केली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला.
