आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हटलं की त्यांच्या वैयक्तिक जीवनावरही सर्वांचं लक्ष असतं. भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या जोडीदारांबाबतही लोक चर्चा करतात. भारताचा युवा स्फोटक क्रिकेटपटू इशान किशनबाबतही अनेकांना जाणू घेण्यात रस आहे. इशानने काल रविवारी पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या सामन्यात भारतानं श्रीलंकेला ७ गडी राखून पराभूत केलं. या विजयात इशानची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. त्यानं ४२ चेंडूत ५९ धावा केल्या. इशाननं पदार्पणात अर्धशतक झळकावून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या. अशात त्याच्या गर्लफ्रेंडबाबतही चर्चा होऊ लागली. इशानची गर्लफ्रेंड टॉपच्या बॉलिवूड अभिनेत्रीलाही टक्कर देते.

इशान किशनच्या गर्लफ्रेंडचं नाव आदिती हुंडिया आहे. ती पेशाने मॉडेल आहे. अदिती सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. ती इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करत असते. २०१७मध्ये फेमिना ‘मिस इंडिया’च्या फायनलमध्ये पोहोचल्यावर आदिती सर्वांच्या ओळखीची झाली. यानंतर तिनं २०१८मध्ये ‘मिस सुपरानॅशनल इंडिया’ अवॉर्डही पटकावला. या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही.

Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Swiggy delivery boy was caught on cctv camera stealing shoes kept outside flat in Gurugram video goes viral
VIDEO : डिलीव्हरी बॉयने चोरले घराबाहेरील शूज, घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Hundia (@aditihundia)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Hundia (@aditihundia)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Hundia (@aditihundia)

इशान किशन नेहमीच अदितीबरोबर फोटो क्लिक करताना दिसतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या काही सामन्यांमध्ये अदिती इशानला साथ देतानाही दिसली. अदितीने इंडिया इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास केला.

हेही वाचा – IND vs SL: वाढदिवस, वनडे पदार्पण आणि झंझावाती अर्धशतक! इशान किशनने नोंदवला खास विक्रम

पहिला वनडे सामना

टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करणाऱ्या भारतीय संघाचे सर्व प्रयोग रविवारी यशस्वी ठरले. कर्णधार शिखर धवन (९५ चेंडूंत नाबाद ८६ धावा), डावखुरा इशान किशन (४२ चेंडूंत ५९) आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (२४ चेंडूंत ४३) या त्रिकुटाने केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारतानं पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला तब्बल सात गडी आणि ८० चेंडू राखून सहज पराभूत केलं. श्रीलंकेनं दिलेलं २६३ धावांचे लक्ष्य भारतानं ३६.४ षटकांत गाठलं.