प्रेसिडेंट्स चषक नेमबाजी स्पर्धा : सौरभला रौप्य, अभिषेकला कांस्यपदक

युक्रेनच्या ओलेना कोस्तेव्हिचने सुवर्ण आणि फ्रान्सच्या माथिल्डे लामोल्लेने रौप्यपदकाची कमाई केली

सौरभ चौधरी

व्रोत्सवाफ (पोलंड)

भारताच्या सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी ‘आयएसएसएफ’ प्रेसिडेंट्स चषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक  पटकावले.

अंतिम फेरीत सौरभने २४ गुणांसह दुसरा, तर अभिषेकने २१ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. जर्मनीच्या ख्रिस्तियन रित्झने ३४ गुणांची कमाई करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. प्रेसिडेंट्स चषक स्पर्धेमध्ये गुण पद्धतीत बदल करण्यात आला असून उपांत्य आणि अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नेमबाजाला चार गुण, दुसऱ्या क्रमांकावरील नेमबाजाला तीन गुण, तिसऱ्या क्रमांकावरील नेमबाजाला दोन गुण आणि अखेरच्या नेमबाजाला एक गुण दिला जातो.

भारताला आतापर्यंत या स्पर्धेत तीन पदके जिंकण्यात यश आले आहे. मनू भाकरने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी इराणच्या जावेद फोरौघीसोबत खेळताना १० मीटर पिस्तूल प्रकाराच्या मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. मनूला महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराची अंतिम फेरी गाठता आली नाही. यात युक्रेनच्या ओलेना कोस्तेव्हिचने सुवर्ण आणि फ्रान्सच्या माथिल्डे लामोल्लेने रौप्यपदकाची कमाई केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Issf presidents cup saurabh chaudhary win silver abhishek verma bronze in mens 10m air pistol zws

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या