ISSF World Cup : मनू भाकेर-सौरभ चौधरीची धडाकेबाज कामगिरी, भारताला आणखी एक सुवर्णपदक

१० मी. एअर पिस्तुल प्रकारात चीनच्या जोडीवर मात

चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने गुरुवारी सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली आहे. मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीने १० मी. एअर पिस्तुल मिश्र प्रकारात सुवर्णपदक कमावलं. याआधी १० मी. एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदक मिळवलं होतं.

अवश्य वाचा – ISSF World Cup : अंजुम मुद्गील, दिव्यांश सिंहला सुवर्णपदक

मनू-सौरभ जोडीने अंतिम फेरीत आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. यजमान चीनच्या जोडीवर १६-६ अशी मात करत भारतीय जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. पात्रता फेरीत मनू-सौरभ जोडीने ४८२ गुणांसह पाचवं स्थान मिळवलं होतं. मनू-सौरभ व्यतिरीक्त हिना सिद्धु-शेहजार रिझवी या भारतीय जोडीला बाराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Issf world cup manu bhaker saurabh chaudhary win gold