विश्वचषक नेमबाजी स्पर्धा- सुवर्ण यशस्विनी!

अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असलेल्या यशस्विनीने पात्रता फेरीत एकूण ५८२ गुण मिळवले.

ऑलिम्पिकमधील भारताचे नववे स्थान निश्चित

यशस्वीनी सिंह देसवालने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युक्रेनच्या ऑलिना कोस्टिव्हायशवर मात करीत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. याचप्रमाणे ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी भारताचे नववे स्थान निश्चित केले.

२२ वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या यशस्विनीने आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत २३६.७ गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या ऑलिनाने २३४.८ गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर सर्बियाच्या जस्मिना मिलाव्होनोव्हिचने २१५.७ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असलेल्या यशस्विनीने पात्रता फेरीत एकूण ५८२ गुण मिळवले. वरिष्ठ गटासाठीच्या कारकीर्दीतील पाचव्या विश्वचषक स्पध्रेत खेळणाऱ्या यशस्विनीने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. पहिल्या फैरीपासून आघाडी घेणारी यशस्विनी मग ०.१ गुणांनी पिछाडीवर पडली. परंतु १६व्या फैरीपासून तिने पुन्हा आघाडी मिळवली. २१व्या फैरीला यशस्विनीने ९.७ गुण मिळवले, तर ऑलिनाने १०.९ गुण मिळवले. याचप्रमाणे पात्रता फेरीत अन्नू राज सिंगने ५७२ गुणांसह २१वे स्थान मिळवले, तर श्वेता सिंगने ५६८ गुणांसह ३१वे स्थान मिळवले. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवून गुणतालिकेतील अग्रस्थान टिकवले आहे.

महिलांच्या ५० मीटर रायफल

  • थ्री पोझिशन्स प्रकारात काजल सैनीला पात्रता फेरीत ११६७ गुणांसह २२व्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्रोनमधील माजी विश्वविजेत्या तेजस्विनी सावंतला ११५६ गुणांसह ४७वे स्थान मिळाले.
  • पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आदर्श सिंग आणि अनिशल भानवाला यांनी पहिल्या प्रीसिजन फेरीत अनुक्रमे १३वे आणि १४वे स्थान मिळवले. या दोघांनी प्रत्येकी २९१ गुण मिळवले. अनहार जावंडाने २८१ गुणांसह ४८वे स्थान मिळवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Issf world cup olympic games economics student akp

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या