अल्माटी : विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील स्कीट प्रकारात भारताच्या गनीमत सेखों आणि दर्शना राठोड यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. विश्वचषकातील स्कीट प्रकारात भारताच्या दोन महिला नेमबाजांनी पदके मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. कझाकस्तानच्या एसेम ओरिनबेने ‘शूट-ऑफ’मध्ये गनीमतला पराभूत करत सुवर्णपदक मिळवले.

गनीमत व ओरिनबेने ६० फैऱ्यांच्या अंतिम फेरीत ५०-५० गुण मिळवले होते. बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या ‘शूट-ऑफ’मध्ये गनीमत दोनपैकी एका लक्ष्याचा वेध घेण्यापासून चुकली. तर, ओरिनबेने दोन्ही वेळा लक्ष्य अचूक वेधले. त्यामुळे गनीमतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विश्वचषकात तिचे हे दुसरे वैयक्तिक पदक ठरले. दर्शनाने वरिष्ठ स्तरावरील प्रथमच अंतिम फेरी गाठताना पदक निश्चित केले. त्यापूर्वी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दर्शनाने १२० गुणांसह राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी करत सहा महिलांच्या अंतिम फेरीसाठी दुसऱ्या स्थानासह पात्रता मिळवली.

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
England cricket great Derek Underwood dies
व्यक्तिवेध : डेरेक अंडरवूड
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य

गनीमत ११७ गुणांसह चौथ्या स्थानी राहिली. ओरिनबे १२१ गुणांसह पदकतालिकेत शीर्ष स्थानी राहिली. अंतिम फेरीत ३० फैऱ्यांनंतर चार नेमबाज शिल्लक राहिले. ज्यामध्ये २५ गुणांसह दर्शना अग्रस्थानी होती. तर, ओरिनबे २४ गुणांसह दुसऱ्या स्थानी होती. दर्शना चेक प्रजासत्ताकच्या बारबोरासह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर होती. पुढील १० फैऱ्यांमध्ये बारबोरा बाहेर पडली आणि भारताची ऐतिहासिक दोन पदके निश्चित झाली. पुरुषांच्या स्कीटमध्ये मैराज खान (११९ गुण), गुरजोत खंगुरा (११९) व अनंतजीत सिंह नरूका (११८) या तिघांनाही अंतिम फेरी गाठता आली नाही.