IND vs SL: IPLच्या स्टार खेळाडूंची भारताकडून निवड; श्रीलंकेच्या प्रशिक्षकाने केलं भारतीय संघाचं कौतुक

आगामी वनडे मालिकेत भारतीय संघाला हलक्यात घेणार नाही असे श्रीलंकेच्या कोचने म्हटले आहे.

It like IPL All Stars XI  Mickey Arthur on India squad for the tour of Sri Lanka
दोन्ही संघ प्रथम तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत आणि त्यानंतर ३ टी -२० सामने होणार आहेत. ( Photo : PTI & Reuters )

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे आणि टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यावर आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने या दौर्‍यावरील भारतीय संघ हा दुय्यम दर्जाचा संघ असून या संघाबरोबर खेळणे हा श्रीलंकेच्या संघाचा अपमान आहे असे नुकतेच म्हटले होते. मात्र श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांना असे वाटत नाही. आगामी वनडे मालिकेत भारतीय संघाला हलक्यात घेणार नाही असे श्रीलंकेच्या कोचने म्हटले आहे.

वनडे मालिका १३ जुलैपासून सुरू होणार होती, परंतु श्रीलंकेच्या संघात करोनाचा शिरकाव या मालिकेचे वेळापत्रकात बदल करण्यात आले. ही मालिका आता १८ जुलैपासून खेळवली जाईल. आर्थरचा असा विश्वास आहे की सध्याची भारताची टीम आयपीएल ऑल स्टार्स इलेव्हनसारखी आहे. दोन्ही संघ प्रथम तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत आणि त्यानंतर ३ टी -२० सामने होणार आहेत.

VIDEO : श्रीलंकेच्या स्टार क्रिकेटपटूंचं इंग्लंडमधील रस्त्यावर ‘लाजिरवाणं’ कृत्य!

श्रीलंकेला नुकताच इंग्लंड दौर्‍यात झालेल्या टी -२० मालिकेमध्ये क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता, तर तीन वनडे सामन्यांत ०-२ अशा फरकाने मालिका गमावावी लागली होती. संघासाठी हा एक अतिशय आव्हानात्मक दौरा होता आणि संघासोबत एकच चुकीची गोष्ट घडली ती म्हणजे निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस आणि दानुष्का गुणथिलाका यांना बायो बबल नियम मोडण्यासाठी घरी पाठविण्यात आले, असे आर्थर म्हणाले.

भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळा बदलल्या, वाचा संपूर्ण वेळापत्रक

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून त्याच्यासाठी हा सर्वात कठीण टप्पा होता असे आर्थर म्हणाले. “हे आव्हानात्मक होते. आम्ही २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी एक संधी मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही काही तरुण खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करीत होतो. पण त्यासोबतच काही अनुभवी खेळाडूंचीही गरज होती. बाहेर जाऊन डरहमला फिरण्याचा निर्णय घेतल्याने आम्ही १, ४ आणि ५ व्या क्रमांकावरील खेळाडू गमावले. आमच्यासाठी हे खरोखर कठीण होते. मी आजवर केलेल्या दौऱ्यांपैकी हा सर्वात कठीण काळ होता,” असे आर्चर म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: It like ipl all stars xi mickey arthur on india squad for the tour of sri lanka abn

ताज्या बातम्या