scorecardresearch

Team India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य

भारतीय संघाचे प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर आहेत. त्यामुळे याचा फटका टीम इंडियाला सातत्याने बसत आहे.

Team India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी (संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला बांगलादेशला वनडे आणि कसोटी मालिका खेळायची आहे. वनडे मालिकेतील अंतिम सामना शनिवारी खेळला जाणार आहे. ही मालिका भारतीय संघाने गमावली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे प्रमुख गोलंदाज बुमराह आणि शमी दुखापतीमुळे बाहेर आहेत. ज्यामुळे संघात प्रमुख गोलंदाजांची उणीव भासत आहे. अशात माजी निवडकर्त्याचे एक मोठे वक्तव्य केले आहे.

टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाच धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने संघातील खेळाडूंच्या दुखापतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मधील फिटनेस चाचणी उत्तीर्ण होऊनही, मालिकेच्या मध्यभागी खेळाडू जखमी होतात. ही समस्या टीम इंडियासाठी वादाचा मुद्दा बनत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी सिलेक्टर आणि क्रिकेटर सबा करीमने म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत टीम इंडियाला नवीन खेळाडू तयार करावे लागतील.

इंडिया न्यूजशी संवाद साधताना सबा करीम म्हणाले, ”जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी जे वारंवार जखमी होत आहेत. त्यामुळे भारतासाठी नवीन वेगवान गोलंदाजांचा पूल तयार करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या पुढचा विचार करायला हवा. फिरकीपटूंच्या बाबतीतही असेच व्हायला हवे, आमच्याकडे वनडेत तीन अव्वल फिरकीपटू हवेत, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल? जर होय, तर त्यांच्याशी खेळत राहा. लोकांसोबत प्रयोग करण्याची वेळ आली आहे.”

हेही वाचा – Fifa World Cup Match: ऐकावे ते नवलच…! चक्क ऑपरेशन सुरु असताना चाहता पाहत राहिला सामना, अन्…

रोहित शर्माशिवाय दीपक चहर आणि कुलदीप सेन हेदेखील दुखापतीमुळे शेवटच्या वनडेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे भारतीय संघाची चिंता आणखीनच वाढली आहे. दरम्यान आता फिरकीपटू कुलदीप यादवचा तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.तसेच एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 13:34 IST

संबंधित बातम्या