scorecardresearch

कॅलिस कोलकाताचा फलंदाजीचा सल्लागार

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गेले चार हंगाम कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केल्यानंतर यंदा जॅक कॅलिस मार्गदर्शक आणि फलंदाजीचा सल्लागार या भूमिकेत दिसणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गेले चार हंगाम कोलकाता नाइट रायडर्सचे खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केल्यानंतर यंदा जॅक कॅलिस मार्गदर्शक आणि फलंदाजीचा सल्लागार या भूमिकेत दिसणार आहे. २०११पासून कॅलिस कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत आहे. २०१२ आणि २०१४मध्ये कोलकातान संघाने आयपीएल जेतेपदावर नाव कोरले होते. या यशात कॅलिसची महत्त्वाची भूमिका होती. याचप्रमाणे गतवर्षी कोलकाताने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते. ‘‘कोलकाता हे गेली चार वष्रे माझे भारतीय कुटुंबीय आहे. माझे सर्वाशी चांगले संबंध आहेत. कोलकाताच्या दोन आयपीएल जेतेपदातही माझी कामगिरी महत्त्वाची होती,’’ असे कॅलिसने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2014 at 06:30 IST

संबंधित बातम्या