India vs Ireland 2nd T20I: भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या २ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बेलफास्टच्या मैदानावर सुरु आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारतीस संघावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. आता दुसऱ्या सामन्यात आयर्लंडकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना आयर्लंडला १५४ धावा करता आल्या आहेत. या धावांचा बचाव करण्यासाठी आलेल्या आयर्लंडकडून जय मुंद्राने पहिल्याच षटकात भारतीय संघाला २ मोठे धक्के दिले.
गेल्या सामन्यात भारतीय संघ मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात पहिलाच सामना खेळत असलेल्या जय मुंद्राने भारतीय फलंदाजांच्या अडचणीत वाढ केली होती. त्याने या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला शून्यावर बाद करत माघारी धाडलं होतं.आता सलग दुसऱ्या सामन्यात त्याने संजू सॅमसनला शून्यावर बाद करत माघारी धाडलं आहे. यासह गेल्या सामन्यात ४९ धावांची खेळी करणारा अभिषेक शर्मा देखील या सामन्यात शून्यावर माघारी परतला. या दोघांना जय मुंद्राने गोल्डन डकवर बाद करत माघारी धाडलं. या दोघांना बाद केल्यानंतर त्याने पुढच्याच षटकात कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करत माघारी धाडलं. यासह त्याने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरचं कंबरडं मोडलं.
जय मुंद्रा गेल्या सामन्यातही भारतीय संघावर भारी पडला होता. पदार्पणाच्या सामन्यात त्याने संजू सॅमसनला शून्यावर त्रिफळाचीत करत माघारी धाडलं होतं.यासह तो आयर्लंडसाठी टी-२० पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो दुसराच गोलंदाज ठरला होता. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ४ षटकं टाकली होती. यादरम्यान त्याने २६ धावा खर्च करुन २ महत्वाचे गडी बाद केले होते.
