सचिन, विराटसह क्रीडाविश्वातून अँडरसनच्या विक्रमाला सलाम

पाकिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात केली दमदार कामगिरी

पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने विक्रमाला गवसणी घातली. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा अँडरसन हा जगातील चौथा तर जलदगती गोलंदाजांपैकी पहिलाच खेळाडू ठरला. याआधी मुथय्या मुरलीथरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांनी ६०० बळींचा टप्पा गाठला होता. अँडरसनच्या या विक्रमाबद्दल क्रिकेटविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

कसोटीच्या अखेरच्या दिवसातली पहिली दोन सत्र पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेली. त्यामुळे अँडरसनला आपला विक्रम करण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार की काय असं चित्र तयार झालं होतं. परंतु अखेरच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर खेळ सुरू झाला. अँडरसनने एका उसळत्या चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला झेलबाद केले. चेंडू नीट न समजल्याने अझर अलीने फटका खेळलाच नाही. पण चेंडू मात्र त्याच्या बॅटला लागला आणि जो रूटने स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला. त्यानंतर क्रिकेटविश्वातून अँडरसनच्या दमदार कामगिरीला सलाम करण्यात आला.

अँडरसनने ६०० बळींचा टप्पा ३३ हजार ७१७ चेंडूंमध्ये गाठला. तर मुथय्या मुरलीथरनने ३३ हजार ७११ चेंडूत ६०० बळी टिपले होते. अँडरसनने ६ चेंडू कमी टाकत ही किमया साधली असती, तर तो सर्वात जलद ६०० बळी टिपणारा गोलंदाज ठरला असता. या यादीत शेन वॉर्न (३४,९२०) तिसरा तर अनिल कुंबळे (३८,४९४) चौथा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: James anderson 600 wickets sachin tendulkar virat kohli yuvraj singh led cricket fraternity as wishes pour vjb

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या