scorecardresearch

Premium

ICC Test Ranking: जेम्स अँडरसनने मोडला ८७ वर्षापूर्वीचा विक्रम; अश्विनसह ‘या’ भारतीय खेळाडूंनाही झाला फायदा, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी

ICC Test Players Rankings: आयसीसीने कसोटी खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला तोटा झाला आहे. त्याच्याकडून नंबर वन गोलंदाजाचा ताज हिरावला गेला आहे.

ICC Test Players Rankings
जेम्स अँडरसन (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

ICC Test Ranking Updates: आयसीसीने बुधवारी ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये गोलंदाजीत मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने क्रमवारीतील खराब फॉर्ममुळे आपला क्रमांक एकचा मुकुट गमावला आहे. इंग्लंडचा ४० वर्षीय जेम्स अँडरसन आपल्या शानदार कामगिरीमुळे २०१८ नंतर पहिल्या क्रमांकावर परतला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज अँडरसनचे ८६६ रेटिंग गुण आहेत. अँडरसनने कारकिर्दीत सहाव्यांदा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

जेम्स अँडरसनने इतिहास रचला इतिहास –

इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन ४० वर्षांचा झाला असला तरी त्याच्या गोलंदाजीतील धार कायम आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसनने सात विकेट घेतल्या, ज्यामुळे त्याला उत्कृष्ट गुण मिळाले आणि तो या स्थानावर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेटने १९३६ मध्ये वयाच्या ४० व्या वर्षी ही कामगिरी केली होती. जेम्स अँडरसनने आता ८७ वर्षांनंतर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.

boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा

अश्विनला नंबर वन होण्याची संधी –

अश्विनचे ​​सध्या ८६४ रेटिंग गुण आहेत. दुसऱ्या कसोटीत रविचंद्रन अश्विनने चमकदार कामगिरी केली, त्याचा फायदा त्यालाही झाला आहे. अश्विन आता कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून तो आता अँडरसनपेक्षा केवळ दोन गुणांनी मागे आहे. तिसऱ्या कसोटीतही त्याने चमकदार कामगिरी सुरू ठेवल्यास तो पुन्हा एकदा हे पहिला क्रमांक पटकावू शकतो. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. त्याचे ८५८ रेटिंग गुण आहेत. तो १४६६ दिवस शीर्षस्थानी राहिला. भारताविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्याची कामगिरी खराब राहिली होती.

हेही वाचा – Cricket Clinic MSD: ‘धोनी की पाठशाला’मध्ये माही बनला ‘गुरु’; अंडर-19 महिला क्रिकेट संघाला दिल्या महत्वाच्या टिप्स

रोहित आणि ऋषभला प्रत्येकी एका स्थानाचा फायदा –

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कर्णधार रोहित शर्माला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे आता ७७७ रेटिंग गुण आहेत. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतलाही स्थान मिळाले आहे. तो ७६९ रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन ९१२ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. लाबुशेनचा देशबांधव स्टीव्ह स्मिथ (८७५ रेटिंग) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे ८६२ रेटिंग गुण आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: James anderson breaks record 87 years ago indian players also benefited in icc test fresh ranking vbm

First published on: 22-02-2023 at 16:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×