कसोटीत ७०० बळी टिपणार? अँडरसन म्हणतो…

पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेत गाठला ६०० बळींचा टप्पा

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटीत धडाकेबाज विक्रम केला. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा अँडरसन हा जगातला पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला. याआधी मुथय्या मुरलीथरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे या तीन फिरकीपटूंनी ६०० बळींचा टप्पा गाठला होता.

दमदार विक्रम करणाऱ्या जेम्स अँडरसनला ७०० बळींचा टप्पा गाठणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर अँडरसन म्हणाला, “मी कर्णधार जो रूटशी याबद्दल चर्चा केली. मी ७०० बळी टिपू शकतो याची मला खात्री आहे. मी माझ्या फिटनेसवर सतत काम करतो आहे. माझा खेळ सुधारण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. ७०० बळींचा पल्ला गाठण्यासाठी मी सक्षम आहे का? असं मला विचारणाऱ्यांना मीच उलट प्रश्न विचारू इच्छितो की मी ७०० बळींचा टप्पा का गाठू शकणार नाही असं वाटतंय?”, अशा शब्दात अँडरसनने निवृत्तीच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला.

असा टिपला ६००वा बळी-

कसोटीच्या अखेरच्या दिवसातली पहिली दोन सत्र पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेली. त्यामुळे अँडरसनला आपला विक्रम करण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार की काय असं चित्र तयार झालं होतं. परंतु अखेरच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर खेळ सुरू झाला. अँडरसनने एका उसळत्या चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला झेलबाद केले. चेंडू नीट न समजल्याने अझर अलीने फटका खेळलाच नाही. पण चेंडू मात्र त्याच्या बॅटला लागला आणि जो रूटने स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: James anderson reaction on retirement and 700 wickets mark in test cricket vjb

Next Story
राजेंद्र धवन
ताज्या बातम्या