अ‍ॅशेस मालिका : जेम्स अँडरसन दुसऱ्या कसोटीमधून दुखापतीमुळे बाहेर

पायाला झालेल्या दुखापतीमुळे घेतला निर्णय

अ‍ॅशेस मालिकेत पहिल्याच कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या इंग्लंडसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यजमान संघाचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबद्दलची माहिती दिली आहे. १४ ऑगस्टपासून ऐतिहासीक लॉर्ड्स मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान, अँडरसनला दुखापत झाली होती. यामुळे काहीकाळ तो मैदानातून बाहेरही गेला होता. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर अँडरसनच्या पोटरीला दुखापत झाल्याचं निष्पन्न झालं. सध्या अँडरसन लँकशायर येथे इंग्लड क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय टीमकडून उपचार घेत आहे. मात्र उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये तो खेळणार की नाही याचा निर्णय आगामी काळात घेण्यात येईल, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: James anderson ruled out of second ashes test due to calf injury psd

ताज्या बातम्या