scorecardresearch

Premium

कोरियाविरुद्ध जपानचे १२ खेळाडू मैदानात; आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून चौकशी

Hockey World Cup 2023`ओडिशा येथे सुरू असलेली विश्वचषक हॉकी स्पर्धा अनाकलनीय घटनांनी चर्चेत आहे. स्पर्धेत मंगळवारी कोरियाविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या सत्रात जपानचे १२ खेळाडू मैदानात होते.

hockey japan vs korea hocky match
कोरिया विरुद्ध जपान विश्वचषक हॉकी स्पर्धा

भुवनेश्वर

Hockey World Cup 2023 ओडिशा येथे सुरू असलेली विश्वचषक हॉकी स्पर्धा अनाकलनीय घटनांनी चर्चेत आहे. स्पर्धेत मंगळवारी कोरियाविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या सत्रात जपानचे १२ खेळाडू मैदानात होते. ही घटना लक्षात आल्यावर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने याची चौकशी करण्याची तयारी दाखवली आहे.

IND vs AUS: Ashwin makes a brilliant comeback in the World Cup after eight years gets a chance against Australia
IND vs AUS, World Cup: अश्विनचे आठ वर्षांनंतर विश्वचषकात शानदार पुनरागमन, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मिळाली संधी
Rohit Sharma's press conference in World Cup 2023
IND vs AUS: रोहित शर्माने संघाची तयारी आणि शुबमन गिलच्या फिटनेसबद्दल दिली मोठी अपडेट; म्हणाला, ‘आमचे खेळाडू…’
Cricket field became a war arena Bangladeshi players beat each other with bats 6 people admitted to hospital
Cricket Fight: क्रिकेट सामन्याचे WWE मध्ये रूपांतर, बॅट अन् स्टंपने तुफान हाणामारी, सहा खेळाडू गंभीर जखमी; पाहा Video
Indian cricket team
विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला?

ब-गटातील या सामन्यात कोरियाने जपानचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या अखेरच्या सत्रात जपानचे १२ खेळाडू खेळले. या घटनेची आंतरराष्ट्रीय महासंघाकडून चौकशी होणार असली, तरी सामन्याचा निकाल बदलणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जपान संघ व्यवस्थापनाने सामन्यानंतर आपली चूक मान्य करताना माफी मागितली आहे.

हॉकी महासंघाच्या नियमाप्रमाणे, सामन्यात ११ खेळाडूच खेळू शकतात. जपानने १२ खेळाडू कसे खेळवले हा चर्चेचा विषय ठरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी विश्वचषक स्पर्धेत अनाकलनीय घटना घडली. सोमवारी न्यूझीलंडने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याला सुरुवात करतानाच गोलरक्षकाला वगळण्याचा निर्णय घेतला होता.मंगळवारी झालेल्या अन्य सामन्यात गतविजेत्या बेल्जियमला जर्मनीने २-२ असे बरोबरीत रोखले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Japan 12 players on the field in the final session against korea amy

First published on: 18-01-2023 at 04:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×