जपानविरुद्धच्या सामन्यात क्रोएशियाचे पारडे जड | Japan vs Croatia Match FIFA Football World Cup 2022 amy 95 | Loksatta

जपानविरुद्धच्या सामन्यात क्रोएशियाचे पारडे जड

आपल्या खेळाच्या बळावर आगेकूच करणाऱ्या जपानसमोर उपउपांत्यपूर्व गतउपविजेत्या क्रोएशिया संघाचे आव्हान असेल. या सामन्यात सर्वाच्या नजरा या क्रोएशियाचा अनुभवी आघाडीपटू लुका मॉड्रिचवर असणार आहे.

जपानविरुद्धच्या सामन्यात क्रोएशियाचे पारडे जड

दोहा : आपल्या खेळाच्या बळावर आगेकूच करणाऱ्या जपानसमोर उपउपांत्यपूर्व गतउपविजेत्या क्रोएशिया संघाचे आव्हान असेल. या सामन्यात सर्वाच्या नजरा या क्रोएशियाचा अनुभवी आघाडीपटू लुका मॉड्रिचवर असणार आहे.जपानने साखळी फेरी इ गटात चमकदार कामगिरी करत स्पेन आणि जर्मनीसारख्या संघांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवत बाद फेरी गाठली.

जपानने अखेरच्या सामन्यात स्पेनवर २-१ असा विजय नोंदवल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या. त्यामुळे क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यातही संघाची मदार ही रित्सु दोआनवर असणार आहे. क्रोएशियाविरुद्ध त्याची कामगिरी निर्णायक ठरणार आहे. तसेच, योशिदाकडूनही संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: मेसी, रोनाल्डोचे विक्रम मोडेल अशी क्षमता फ्रान्सच्या किलियन एम्बापेमध्ये आहे का?

दुसरीकडे, क्रोएशियाने बेल्जियमसोबत अखेरच्या साखळी सामन्यात बरोबरी साधण्यात यश मिळवले. यामुळे फ-गटात त्यांनी दुसरे स्थान मिळवत आगेकूच केली. संघाला या सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास मॉड्रिचसह क्रॅमारिच, पेरिसिचलाही चांगली कामगिरी करावी लागेल. संघाच्या बचावफळीने साखळी सामन्यांमध्ये आपली चुणूक दाखवली. तीच लय त्यांना या लढतीतही कायम राखावी लागेल.

’ वेळ : रात्री. ८.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, १ एचडी, स्पोर्ट्स १८ खेल, जिओ सिनेमा

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 00:38 IST
Next Story
ऑस्ट्रेलियाला नमवत अर्जेटिना उपांत्यपूर्व फेरीत