Jasprit Bumrah Comment on Temba Bavuma: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने टीब्रेकपर्यंत ८ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या. जसप्रीत बुमराहने या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी करत विकेट्स तर घेतल्याच, पण धावाही फारशा दिल्या नाहीत. यादरम्यान बुमराहचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने बावुमाबद्दल बोललेलं वाक्य व्हायरल होत आहे.
बुमराहने एडम मारक्रम आणि रायन रिकेलटन यांना बाद केलं. यानंतर तेंबा बावुमा बुमराहच्या रडारवर होता. यादरम्यान रिव्ह्यूसाठी चर्चा करतानाचा बुमराहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जस्सी तेंबा बावुमाबद्दल वादग्रस्त कमेंट करताना दिसत आहे.
कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १३ व्या षटकातीत ही घटना घडली. बुमराहने षटकातील शेवटच्या चेंडूवर बावुमाला उत्कृष्ट चेंडूने आश्चर्यचकित केलं. चेंडू बावुमाच्या पॅडच्या वरच्या बाजूला लागला. पायचीत बाद झाल्याचं जोरदार अपील करण्यात आलं, पण पंचांनी ते फेटाळून लावलं. भारतीय खेळाडू रिव्ह्यू घ्यायचा की नाही यावर चर्चा केली जात होती. डीआरएसबाबत चर्चा करत असताना, बुमराह बावुमाला लगेच बुटका असं म्हणाला.
तेंबा बावुमाबाबत जसप्रीत बुमराह नेमकं काय म्हणाला?
ऋषभ पंतने रिव्ह्यूबाबत बोलताना चेंडू खूप वर असल्याचे सांगत उंचीबाबत बोलत होता. तितक्यात बुमराह म्हणाला की, “अरे हा पण बुटका आहे ना. तितक्यात पंत म्हणतो, “ते ठिके पण चेंडू पॅडच्या वर लागला आहे.” यासह संघाने रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. नंतर जेव्हा बॉल ट्रॅकिंग तपासण्यात आलं तेव्हा असं आढळून आलं की चेंडू लेग स्टंपवरून जात होता. बुमराह फक्त चर्चा करत असताना त्याने उल्लेख केला.
कोलकाता कसोटीत जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये त्याने ७ षटकांत ९ धावा देत २ विकेट्स घेतल्या, ज्यात ४ मेडनचा समावेश होता. या दोन्ही विकेट्स दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांच्या होत्या. यानंतर त्याने टॉनी दी झॉर्झी, काईल वेरेन व महाराजला पायचीत केलं. तर हार्मरला क्लीन बोल्ड केलं. यासह जस्सीने कसोटीच्या पहिल्याच दिवशी १४ षटकांत २७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने ५ मेडन षटकं टाकली.
