Jasprit Bumrah said batter hide behind the bat : जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज आहे, पण त्याच्या गेल्या काही विधानांवरून त्याला संघाचा कर्णधार बनण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट होते. जसप्रीत बुमराहने रोहित शर्माच्या गैरहजेरीत टीम इंडियाचे कर्णधार भूषवले आहे. मात्र, सध्या तो संघाचा कर्णधार आणि उपकर्णधारही नाही. जर आपण त्याच्या मागील काही विधानांवर नजर टाकली, तर त्याने एकेकाळी स्वत: चे सर्वोत्तम कर्णधार म्हणून वर्णन केले होते. आता त्याने आणखी एक मोठे विधान केले आहे.

भारताचा वेगवान दोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला की गोलंदाज ‘स्मार्ट’ आहेत कारण ते कारण ते बॅटच्या मागे लपत नाहीत. त्याचे म्हणणे आहे की संघाचे नेतृत्त्व करण्यासाठी गोलंदाज योग्य आहेत. त्याने कपिल देव आणि इम्रान खान यांनी आपापल्या संघाचे नेतृत्त्व करताना मिळवून दिलेल्या यशाची सर्वांना आठवण करून दिली. आताही पॅट कमिन्स हा एक यशस्वी कर्णधार आहे, ज्याने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. तसेच पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकावरही नाव कोरले आहे.

Sanjay Manjrekar on Mohammed Shami for Border Gavaskar Trophy
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी फिट नसेल तर ‘हा’ गोलंदाज उत्तम पर्याय; संजय मांजरेकरांचं वक्तव्य
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
Try to keep him in his crease says Nathan Lyon on Rishabh Pant
‘…षटकारांची भीती वाटत नाही’, ऋषभ पंतबद्दल बोलताना नॅथन लॉयन काय म्हणाला?
Australian captain Pat Cummins statement regarding Rishabh Pant
पंतला रोखणे आवश्यक -कमिन्स
Ian Chappell Statement on Jasprit Bumrah Rishabh Pant innings in Border Gavaskar Trophy Test Series sports news
बुमरा, पंतची लय महत्त्वाची; बॉर्डरगावस्कर मालिकेबाबत चॅपल यांचे विधान
Cricket Test series, India, bangladesh
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेवर बिघडलेल्या संबंधांचे प्रतिबिंब? पाकिस्तानप्रमाणेच भारतीय संघालाही बांगला खेळाडू चिथावणार का?
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’

जसप्रीत बुमराहच्या मते गोलंदाज स्मार्ट असतात –

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जसप्रीत बुमराह म्हणाला, “माझा विश्वास आहे की गोलंदाज ‘स्मार्ट’ असतात कारण त्यांना फलंदाजांना बाद करावे लागते. फलंदाजांना बाद करण्यासाठी गोलंदाजांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. तसेच त्यांना फलंदाजांसारखे बॅटच्या मागे लपण्याची गरज नसते, त्यांना सपाट विकेट्सच्या मागे लपण्याची गरज नसते. आम्ही नेहमीच टार्गेटवर असतो. जेव्हा आम्ही एखादा सामना हारतो, तेव्हा त्याचे खापर सहसा गोलंदाजांवरच फोडले जाते.”

हेही वाचा – Khaleel Ahmed : ‘माही भाई माझा मित्र नाही भाऊही नाही, तो तर…’, धोनीबद्दल खलीलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, मी झहीर…

बुमराहने कपिल देव आणि पॅट कमिन्सचे उदाहरण दिले –

जसप्रीत बुमराह पुढे उदाहरण देताना म्हणाला, “आपण पॅट कमिन्सला कर्णधार म्हणून दमदार कामगिरी करताना पाहिले आहे. तसेच मी लहान असताना वसीम अक्रम आणि वकार युनूस यांना कर्णधार म्हणून पाहिले. विशेष म्हणजे कपिल देव यांनी आपल्याला पहिला विश्वचषक जिंकून दिला आहे. इम्रान खान यांनी पण पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यामुळे मला वाटते गोलंदाज हुशार (स्मार्ट) असतात.”

हेही वाचा – Deepti Sharma : दीप्ती शर्माने खणखणीत षटकार ठोकून The Hundred मध्ये संघाला पहिल्यांदाच बनवले चॅम्पियन, पाहा VIDEO

गोलंदाज खेळाला पुढे घेऊन जातात –

जसप्रीत बुमराह म्हणाला की लोक फलंदाजांशी अधिक जोडले जातात, परंतु भारतीय संघात फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात कोणताही फरक नाही. तो म्हणाला, “मला माहित आहे की आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात फलंदाज आवडतात आणि ते योग्यच आहे. पण माझ्या मते गोलंदाज खेळाला पुढे घेऊन जातात. कारण मी अशा पिढीतून आलो आहे, जिथे कसोटी क्रिकेट टेलिव्हिजनवर अधिक दाखवले जायचे. त्यामुळे माझ्यासाठी, आजपर्यंत हा फॉरमॅट सर्वात महत्त्वाचा राहिला आहे. कारण मला वाटते की, जर मी यामध्ये चांगली कामगिरी केली तर इतर सर्व फॉरमॅटमध्ये आपसूकच चांगली कामगिरी होईल.”