Jasprit Bumrah: भारतीय क्रिकेट संघाला टी२० विश्वचषका आधी खूप मोठा झटका बसला आहे. संघातील प्रमुख जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ तयारी करत आहे. विश्वचषकाची सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर झाला आहे. बुमराह मागील मोठ्या कालावधीपासून दुखापतीचा सामना करत आहे. खरं तर दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहला आशिया चषकातून देखील बाहेर व्हावे लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती ही टीम इंडियाला परवडवणारी नाही. कारण बुमराह गोलंदाजी करतो, त्यावेळी त्याची दिशा, टप्पा आणि यॉर्करला तोड नाहीय. दरम्यान, बुमराह आगामी विश्वचषकातून बाहेर झाल्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार सलमान बट्ट बुमराहच्या मदतीला धावून आला आहे. तसेच बुमराहच्या दुखापतीवरून त्याने भारतीय संघाच्या व्यवस्थापन समितीला इशारा दिला आहे.

हेही वाचा  :Umpire Aleem Dar: इंग्लड-पाकिस्तान यांच्यातील टी२०सामन्यात पंच आलीम दार थोडक्यात बचावले नाहीतर., नेमके काय झाले वाचा

“मला वाटते की तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पूर्ण तंदुरुस्त होऊन आला नव्हता. त्याची दुखापत त्याच्यासोबतच होती. संघ व्यवस्थापनाने त्याचे पुनरागमन करण्यात घाई केली.” सलमान बट्टने त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटले, “जसप्रीत बुमराहची ॲक्शन अशी आहे की त्याचा पूर्ण लोड पाठीवरच पडतो. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. याशिवाय आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील तो खेळत असतो. बुमराह हा फेरारी कार, ॲस्टन मार्टिन किंवा लॅम्बोर्गिनीसारखा आहे. यापद्धतीने महागड्या गाड्यांचा वेग असतो. त्यांना वीकेंड कार म्हटले जाते. हे तुमच्या टोयोटा कोरोलासारखे नाही, जी दररोज आणि सगळीकडे चालवली जाऊ शकते.”

हेही वाचा  :World Team TT Championships: जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात, पुरुष संघाने केला उझबेकिस्तानचा पराभव

बुमराहची विश्वचषकात सहभागी होण्याची संधी गेल्याचे म्हटले जातेय. याच संपूर्ण प्रकरणावर बोलताना भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत देताना म्हटले, रोहित आणि त्याच्या संघ व्यवस्थापनाने बुमराहसंदर्भात खूप हट्टीपणा केला. तो पूर्णपणे तंदुरस्त नसताना सुद्धा त्याला नागपूरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामन्यात खेळण्यास भाग पाडले.”

बुमराहला जपण्याची गरज

असे सलमान बट्टने पुढे असे म्हटले की,”प्रत्येकजण ते स्क्रॅच करू शकतो. वीकेंड कार म्हणजे अर्थातच यांना वीकेंडलाच चालवायला हवे. बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजाला सांभाळून ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात त्याला खेळवणे टाळायला हवे”,

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah former pakistan player says jasprit bumrah is the runaway car of the indian team avw
First published on: 01-10-2022 at 14:00 IST