scorecardresearch

Jasprit Bumrah Injury: टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; बुमराह IPL 2023 आणि WTC फायनलमध्ये खेळणे साशंक

Jasprit Bumrah Injury Update: जसप्रीत बुमराह २५ सप्टेंबर २०२२ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेटचा सामना खेळला होता. हा सामना मायदेशात झालेल्या टी-२० सामना होता.

BCCI is planning a new plan for Jasprit Bumrah
जसप्रीत बुमराह (फोटो- संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Jasprit Bumrah likely to miss IPL 2023 and WTC final: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. त्याच्या पाठीची दुखापत आता पूर्वीपेक्षा खूपच गंभीर असल्याचे दिसून येत आहे. आता तो आगामी आयपीएल २०२३ मधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणेही त्याच्यासाठी कठीण आहे, ज्यासाठी भारत पात्रतेच्या अगदी जवळ आहे.

डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह गेल्या ७ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर बुमराहच्या पाठीची समस्या समोर आली होती. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे बुमराह आशिया कपमध्ये खेळू शकला नाही. यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२०मालिकेत पुनरागमन केले पण त्याला केवळ दोन सामन्यांनंतर वगळण्यात आले. यानंतर बुमराह टी-२०विश्वचषकातूनही पूर्णपणे बाहेर झाला होता.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएलच्या सूत्रांनी असे सूचित केले आहे, की जवळपास पाच महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर असलेल्या बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नाही. त्यामुळे तो कदाचित बराच काळ बाहेर राहू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराहला आशिया चषकालाही मुकावे लागले असले तरी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणा-या विश्वचषकापर्यंत जसप्रीत बुमराहला तंदुरुस्त ठेवण्याकडे टीम इंडियाचे लक्ष आहे.

हेही वाचा – Womens T20 WC 2023: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला मिळाले कोटी रुपये, जाणून घ्या कोणता पुरस्कार कोणाला मिळाला?

२५ सप्टेंबरला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता –

गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर दुखापत झाली होती. त्यानंतरर बुमराहने २५ सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात पुनरागमन केले, परंतु दुखापतीमुळे त्याचा त्रास वाढत गेला. वर्षाच्या सुरुवातीला, श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याचे नाव होते, परंतु मालिकेपूर्वी त्याला वगळण्यात आले.

हेही वाचा – Womens T20 WC 2023: मेग लॅनिंगने पाँटिंग-धोनीला मागे टाकत रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली कर्णधार

सुरुवातीला अशा बातम्या आल्या की, जर बुमराहने आयपीएलमध्ये पुनरागमन केले, तर ते इतके वाईट होणार नाही. कारण तो एका सामन्यात फक्त चार षटके टाकेल आणि मूळ योजना त्याच्यासाठी हळूहळू कामाचा ताण वाढवण्याची होती. त्यासाठी त्याचे आयपीएलमधील पुनरागमन सुनियोजित होते. पण आता खूप वेळ लागेल. बीसीसीआय, एनसीए आणि भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्या पुनरागमनासाठी काळजीपूर्वक नियोजित वेळापत्रक तयार करत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 11:11 IST
ताज्या बातम्या