Most No Balls In IPL History : आयपीएल २०२३ सुरु होण्यासाठी तीन दिवस बाकी आहेत. ३१ मार्च २०२३ पासून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात रंगतदार सामने पाहायला मिळणार आहे. या टूर्नामेंटमध्ये १० संघ आमने-सामने असणार आहेत. पण तुम्हाला माहितीय का आयपीएलमध्ये सर्वात जास्त नो बॉल फेकण्याचा लाजिरवाणा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तुम्हाला याबाबत माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला या गोलंदाजांच्या कामगिरीबाबत सांगणार आहोत, या खेळाडूंची नाव वाचून तु्म्हालाहा आश्चर्य वाटेल. कारण क्रिकेटच्या मैदानावर या गोलंदाजांचा खूपच बोलबाला असतो. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त नो बॉल फेकण्याचा लाजिरवाणा विक्रम मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. बुमराहने आतापर्यंत २८ नो बॉल फेकले आहेत. जसप्रीत बुमराहला IPLमध्ये खेळून १० सीजन झाले आहेत. बुमराहने १४५ घेतले आहेत, परंतु नो बॉलही खूप फेकले आहेत. आयपीएलमध्ये सर्वात जास्त नो बॉल फेकण्याच्या क्रमवारीत उमेश यादव दुसऱ्या स्थानावर आहे. उमेशने २४ नो बॉल फेकले आहेत. तर एस श्रीसंतने २३ वेळा ओव्हर स्टेपिंग केली होती. तसंच अमित मिश्राने २१ वेळा नो बॉल फेकला आहे. लसिथ मलिंगाने १८ वेळा नो बॉल फेकलं असून प्रसिद्ध कृष्णाने १७ नो बॉल फेकण्याची खराब कामगिरी केली होती. नक्की वाचा - IPL History: …म्हणून ‘या’ चार खेळाडूंचं क्रिकेट करिअर झालं खराब, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण IPL मध्ये सर्वात जास्त नो बॉल फेकणारे गोलंदाज २८ - जसप्रीत बुमराह२४- उमेश यादव२३- एस श्रीसंत२१- अमित मिश्रा२१- इशांत शर्मा१८ - लसिथ मलिंगा१७- प्रसिद्ध कृष्णा