Mumbai Indians New Captain Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मधील आपला १२वा सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळणार आहे. मुंबई संघाने या सामन्यासाठी एक आश्चर्यकारक बदल केला आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह २०१३ पासून संघाचा भाग आहे, पण मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या अनुपस्थितीत त्याला ही संधी देण्यात आली आहे.

हार्दिक पांड्या पाठदुखीने त्रस्त असून, त्यामुळे तो गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर आहे आणि अद्याप धरमशाला येथे पोहोचलेला नाही. सूर्यकुमार यादवदेखील वैयक्तिक कारणांमुळे संघाबाहेर आहे. त्याने गेल्या दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले होतेचं नेतृत्त्व केलं होतं. हे दोन्ही खेळाडू संघाचा भाग नसल्याने संघ व्यवस्थापनाला नवीन कर्णधाराची नियुक्ती करणं भाग पडलं आहे.

जसप्रीत बुमराहने यापूर्वी आयर्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आणि इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, त्याला आयपीएलमधील कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नाही. बुमराह मुंबई इंडियन्सचा १० वा कर्णधार आहे. त्याच्याआधी हरभजन सिंग, शॉन पोलॉक, सचिन तेंडुलकर, ड्वेन ब्राव्हो, रिकी पॉन्टिंग, रोहित शर्मा, कायरेन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह या खेळाडूंनी मुंबईचं नेतृत्त्व केलं आहे.

नेतृत्त्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर बुमराह काय म्हणाला?

नाणेफेकीच्या वेळी कर्णधारपदाची जबाबदारी घेण्याबद्दल बोलताना बुमराह म्हणाला, “खूप छान वाटत आहे. मी वयाच्या १९ व्या वर्षी इथे (मुंबई इंडियन्समध्ये) आलो. एमआयचा कर्णधार होण्यापूर्वी, मी कधी विचारही केला नव्हता की मी कसोटी कर्णधार होईन. मला ही जबाबदारी आवडते, हे एक नवीन आव्हान आहे आणि मी त्याचा आनंद घेणार आहे.”

पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

रायव रिकलटन (यष्टीरक्षक), नमन धीर, शेरफन रुदरफोर्ड, तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कार्बिन बॉश, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रघू शर्मा

इम्पॅक्ट खेळाडू- रोहित शर्मा, मयांक रावत, रॉबिन मिन्झ, क्रिश भगत, ट्रेंट बोल्ट