टी २० विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र क्रीडाप्रेमींचं भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे लक्ष लागले आहे. दोन्ही देशांसाठी हा निव्वल सामना नसून प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार?, या चर्चांना आतापासूनच उधाण आलं आहे. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियादाननं पाकिस्तान संघाची कमकुवत बाजूवर बोट ठेवलं आहे. पाकिस्तान संघ एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून राहिल्यास नुकसान होईल असं मत जावेद मियादान यांनी व्यक्त केलं आहे. कराचीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“संघाने समन्वयाने खेळणे आवश्यक आहे. प्रत्येक खेळाडूने स्वत:चे योगदान देणं आवश्यक आहे. पाकिस्तान संघ जर एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून राहिला तर टी २० विश्वचषकात नुकसान होईल. भारताविरुद्धचा सामना कोणत्याही भीतीशिवाय आणि दबावाशिवाय खेळणं गरजेचं आहे. दबाव चांगल्या प्रकारे हाताळण्याासाठी खेळाडूंना आत्मविश्वास वाढवावा लागेल. पाकिस्तानी फलंदाजांनी गुणवत्तेनुसार खेळले पाहीजे. पैशांची बाब डोक्यातून काढून खेळले पाहीजे. कारण चांगलं खेळलात तरच तुम्हीच पैसे कमवाल.”, असं मत जावेद मियादाद यांनी व्यक्त केलं आहे.

जेव्हाही दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने असतात, तेव्हा खेळाडूही सामना जिंकण्यासाठी सामना जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतात. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीझ राजा यांनी पाकिस्तानी खेळाडूंना बंपर ऑफर दिली आहे. ”टी-२० विश्वचषकात भारताचा पराभव केल्यावर पाकिस्तानी खेळाडूंना एक कोरा चेक देण्यात येईल”, असे राजा यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed miandad say issue about pakistan team in t20 world cup rmt
First published on: 13-10-2021 at 16:39 IST