Jay Shah New ICC Chairman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांच्याबाबत एक मोठी बातमी आली आहे. जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवे अध्यक्ष होणार आहेत. ICC चेअरमन पदासाठी अर्ज करणारे एकमेव अर्जदार जय शाह होते. यासह जय शाह यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली. येत्या १ डिंसेबर २०२४ पासून जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. २७ ऑगस्ट ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. ३५ वर्षीय जय शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.

हेही वाचा – जय शाह यांची मोठी घोषणा; BCCIकडून भारतीय क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, बक्षीस रक्कम जाहीर

Rohit Sharma and Rohit Pawar Karjat Jamkhed
Rohit Sharma in Ahmednagar: “तेव्हा कुठं माझ्या जीवात जीव आला…”, रोहित पवारांच्या समोर अहमदनगरमध्ये रोहित शर्माची फटकेबाजी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
ajit pawar ncp searching president for pimpri chinchwad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये शहराध्यक्ष मिळेना
Sri lanka president taking oath
श्रीलंकेच्या नव्या अध्यक्षांचे भारतविरोधी विचार? भारत-श्रीलंकेच्या संबंधांवर परिणाम होणार?
Anura Dissanayake
Anura Dissanayake : कोण आहेत श्रीलंकेचे नवे अध्यक्ष अनुरा दिसनायके? २०१९ च्या निवडणुकीत ३ टक्के मतं, मग २०२४ मध्ये कसं केलं पुनरागमन?
Anura Dissanayake Sri Lanka first Marxist President
अनुरा दिसानायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष
Joe Biden maintains Donald Trumps India-policy and takes it to the heights
बायडेन यांनी ट्रम्प यांचे भारत-धोरण राखले आणि उंचीवर नेले…
Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप

आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यांनी सलग दुसऱ्यांदा हे पद भूषवले आहे. पण अलीकडेच त्याने तिसऱ्या टर्मच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत, खेळाची जागतिक प्रशासकीय संस्था असलेल्या आयसीसीमध्ये जय शाह अध्यक्षपदासाठी दावा खूप मजबूत मानला जात होता. जय शाह यांनी बीसीसीआयचे सचिव म्हणून भारतीय क्रिकेटला वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवले. आता त्यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्याचा फायदा भारतीय क्रिकेटलाही नक्कीच होईल, असे सुनील गावसकर यांनीही त्यांच्या क्रीडा स्तंभलेखात म्हटले होते.

ICC नुसार, जय शाह हे एकमेव उमेदवार होते ज्यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला होता आणि पुढील अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. शाह हे आयसीसी बोर्डातील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. ते सध्या आयसीसीच्या शक्तिशाली वित्त आणि व्यावसायिक व्यवहार उप-समितीचे प्रमुख आहेत.

हेही वाचा – VIDEO: सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटूने सुपर ओव्हरमध्ये संघाला जिंकून दिला सामना, भारताच्या जेमिमा रॉड्रीग्जने दिली साथ

ICC अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जय शाह काय म्हणाले?

ICC अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जय शाह यांनी क्रिकेटचा जागतिक स्तरावर पोहोच आणि लोकप्रियता आणखी वाढवण्याचा मानस व्यक्त केला. आयसीसीच्या निवेदनानुसार शाह म्हणाले की, “आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे मी भारावून गेलो आहे. जागतिक क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी आयसीसी संघ आणि आमच्या सदस्य राष्ट्रांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे. आम्ही एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभे आहोत जिथे अनेक स्वरूपांच्या सह-अस्तित्वाचा समतोल राखणे, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि नवीन जागतिक बाजारपेठांमध्ये आमच्या प्रमुख कार्यक्रमांची ओळख करून देणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. क्रिकेटला आणखी लोकप्रिय बनवण्याचा आमचा उद्देश आहे.”

हेही वाचा – Sunil Gavaskar on Jay Shah: ‘जय शाह ICC चे अध्यक्ष झाले तर भारतीय क्रिकेट…” सुनील गावसकरांचे शाह यांच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवर मोठे वक्तव्य

जय शाह म्हणाले, “जगभर क्रिकेटला अधिक पसंती मिळावी यासाठी अधिक विचार करण्याची गरज आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ मध्ये क्रिकेटचा समावेश केल्याने क्रिकेट वाढत असल्याचे दिसून येते. मला विश्वास आहे की हा खेळ अभूतपूर्व मार्गांनी पुढे जाईल”