Jay Shah has take over the post of ICC President : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) चेअरमनपद स्वीकारले आहे, ग्रेग बार्कले यांची जागा घेणारे ३५ वर्षीय जय शाह हे आयसीसीच सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. २०२० मध्ये पहिल्यांदा या पदावर नियुक्त झाल्यानंतर बार्कलेने तिसरी टर्म न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यानंतर या पदासाठी जय शहा यांची निवड झाली.

जय शाहने आयसीसीचे चेअरमनपद स्वीकारणारे पाचवे भारतीय –

जय शाह आता शरद पवार, एन श्रीनिवासन, शशांक मनोहर आणि जगमोहन दालमिया यांसारख्या भारतीय प्रशासकांच्या यादीत सामील झाले आहेत. जय शाहने २००९ मध्ये क्रिकेट प्रशासनातील आपला प्रवास सुरू केला होता. सेंट्रल क्रिकेट बोर्ड, अहमदाबादच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी प्रवास सुरु केला होता, सप्टेंबर २०१३ मध्ये, शाह यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) चे संयुक्त सचिव झाल्यानंतर अहमदाबादमधील प्रतिष्ठित नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बांधकामात मदत केली. २०१५ मध्ये, ते बीसीसीआयमध्ये वित्त आणि विपणन समितीचे सदस्य म्हणून सामील झाले.

Why Rohit Sharma Will Visit Pakistan Ahead of ICC Champions Trophy 2025 According To Reports
Champions Trophy: रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला का जावं लागणार? का सुरू आहे चर्चा? वाचा कारण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
Mohammed Shami brilliant bowling for Bengal in Vijay Hazare Trophy ahead Champions Trophy 2025
Mohammed Shami : मोहम्मद शमी पुनरागमनासाठी सज्ज! पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
sana khan welcomes second baby boy
धर्मासाठी बॉलीवूड सोडणारी सना खान दुसऱ्यांदा झाली आई, दीड वर्षांचा आहे पहिला मुलगा
Rashid Khan 11 Wickets career best helps Afghanistan register series win vs Zimbabwe Ramat Shah Century
AFG vs ZIM: रशीद खानची कारकिर्दीतील सर्वाेत्कृष्ट गोलंदाजी, ११ विकेट्स घेत अफगाणिस्तानला असा मिळवून दिला मालिका विजय
aamir khan son junaid khan laapta ladies audition
आमिर खानच्या मुलाने ‘लापता लेडीज’साठी दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “किरणने मला…”

आयसीसीने चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जय शाह यांचे विधानही प्रसिद्ध केले, ज्यात त्यांनी म्हटले की, ते क्रिकेटच्या जागतिक विस्तारावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहेत, ज्यामध्ये २०२८ मध्ये होणारे ऑलिम्पिक खेळ हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. ज्यावर आयसीसी सध्या विशेष लक्ष देणार आहे. याबाबत सर्व आयसीसी सदस्यांसोबत संयुक्तपणे काम केले जाईल. हे पद स्वीकारताना मला खूप सन्मान वाटतो. जगभरात या गेमसाठी भरपूर क्षमता आहे, ज्यामध्ये आम्हाला नवीन चाहते जोडण्याची संधी देखील मिळेल. महिला क्रीडा विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणे हे आमचे लक्ष्य असेल. त्याचबरोबर ते चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ बाबतही निर्णय घेतील.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माच्या मुलाचे काय ठेवले नाव? पत्नी रितिका सजदेहने इन्स्टा स्टोरी शेअर करत दिली माहिती

जय शाह यांच्यासमोरील आव्हाने कोणती?

जय शाह यांनी आयसीसीची सूत्रे हाती घेतल्याने त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या असतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे ‘बिग 3’ आहेत आणि आयसीसीला या देशांच्या सामन्यांमधून सर्वाधिक महसूल मिळतो. ‘बिग 3’ लाही आयसीसीचा सर्वाधिक महसूल मिळतो. याआधी क्रिकेट वेस्ट इंडिजचे प्रमुख जॉनी ग्रेव्ह म्हणाले होते की, महसूल वाटपाचे मॉडेल पूर्णपणे तुटले आहे. किमान कसोटी खेळणाऱ्या देशांना पुरेसा पैसा मिळावा, जेणेकरून ते पुढे जाऊ शकतील, हे शहा यांच्यासमोर आव्हान आहे.

Story img Loader