भारताच्या ‘या’ खेळाडूने IPL मध्ये रचलाय इतिहास; रोहित-द्रविडने संधी दिली नाही, पण…

एक भारतीय गोलंदाज टीममध्ये असूनही प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा निश्चित करू शकला नाही, यामागचे कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क.

Most Runs Scored In Death Overs Of IPL History
या खेळाडूने IPL मध्ये केलाय मोठा विक्रम. (Image-Indian Express)

Interesting Facts Of Team India : आयपीएल २०२३ अनेक खेळाडूंसाठी अत्यंत महत्वाची टूर्नामेंट असणार आहे. आगामी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये जागा पक्की करण्यासाठी अनेक खेळाडू आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्याच्या प्रयत्न करताना दिसतील. पण एक भारतीय गोलंदाज टीममध्ये असूनही प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा निश्चित करू शकला नाहीय. त्याने १० वर्षांपासून वनडे क्रिकेटचा एकही सामना खेळला नाही. अशा परिस्थितीत तो खेळाडू आता टी-२० लीग क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांनाच जोरदार उत्तर देण्यास सज्ज झाला आहे.

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अनेक खेळाडूंना नॅशनल टीममध्ये संधी मिळाली आहे. त्यानंतर या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये देशी-विदेशी दोन्ही प्रकारच्या खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये अनेक खेळाडूंच्या चमकदार कामगिरी करण्याच्या आशा पल्लवीत होण्याची शक्यता आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट या खेळाडूंपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये जयदेवला संधी मिळाली होती. पण कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने एकाही सामन्यात प्लेईंग ११ मध्ये जयदेवला संधी दिली नाही. जयदेव १० वर्षांपासून वनडे मॅच खेळला नाहीय.

नक्की वाचा – मॅक्यूलमच्या शतकापासून सचिन तेंडुलकरच्या ऑरेंज कॅपपर्यंत… ‘हा’ IPL इतिहास वाचून तुम्हीही व्हाल थक्क

१३ वर्षांच्या जयदेवचा आयपीएल रेकॉर्ड जबरदस्त आहे. आयपीएलमध्ये दोन वेळा ५ विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी करणारा जयदेव उनादकट भारताचा एकमेव खेळाडू आहे. जयदेवने २०१३ मध्ये हा पराक्रम दिल्ली विरोधात झालेल्या सामन्यात केला होता. तेव्हा जयदेव विराट कोहलीची टीम आरसीबीकडून खेळत होता. जयदेवने त्या सामन्यात ४ षटकांमध्ये ५ विकेट्स घेतले होते. यामध्ये विरेंद्र सेहवागपासून महेला जयवर्धनेच्या विकेटचा समावेश होता. त्यानंतर २०१७ मध्ये जयदेवने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली होती. त्या सामन्यात जयदेवने हैद्राबाद विरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या. जयदेवने ४ षटकांत ३० धावा देत पाच विकेट घेण्याची कमाल केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 16:56 IST
Next Story
IPL: डेथ ओव्हर्समध्ये ‘या’ फलंदाजांनी पाडलाय चौकार-षटकारांचा पाऊस, एम एस धोनी कितव्या स्थानावर?
Exit mobile version