“बाप कौन है? असा प्रश्न विचारताच मोहम्मद शमीने….”; मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल व्हिडिओ केला ट्वीट!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत मोहम्मद शमी कोण आहे? याचा दाखला दिला आहे.

Mohmmad_Shami_Viral
"बाप कौन है? असा प्रश्न विचारताच मोहम्मद शमीने…."; मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल व्हिडिओ केला ट्वीट!

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमीला लक्ष्य केले जात आहे. संघ आणि देशावरील त्याच्या निष्ठेबद्दलही अनावश्यक गोष्टी बोलल्या जात आहेत. मात्र आजी माजी दिग्गज क्रिकेटपटूंसह बीसीसीआय शमीच्या समर्थनार्थ पुढे आलं आहे. त्यात राजकीय नेतेही सोशल मीडियावरून शमीच्या पाठिशी उभे राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत मोहम्मद शमी कोण आहे? याचा दाखला दिला आहे.

“हा मोहम्मद शमी आहे ज्यानं परवाचा सामना संपल्यावर “बाप कौन है” असा प्रश्न विचारता संपूर्ण भारतीय संघाला हिणवणाऱ्या दर्शकाला भिडायचं डेरिंग केलं. बाप कौन हे ऐकल्यावर एकटाच त्या दर्शकाला त्याचा बाप दाखवायला माघारी फिरला होता”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मात्र हा व्हायरल व्हिडिओ परवाच्या सामन्याचं नसून चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नव्हता. मात्र असं असूनही मोहम्मद शमीवर निशाणा साधला जात आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात रिझवानने ५५ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. रिझवानने कर्णधार बाबरच्या साथीने १५२ धावांचे लक्ष्य १८व्या षटकात पूर्ण केले. त्या सामन्यात रिझवानने शमीवर हल्ला चढवला. शमी पाकिस्तानच्या डावातील १८ वे षटक टाकण्यासाठी आला. रिझवानने आपल्या षटकातील पहिल्या चेंडूवर ६ चौकार आणि पुढच्या दोन चेंडूंवर २ चौकार मारले. या सामन्यात शमी चांगलाच महागात पडला. त्याने ३.५ षटकात एकूण ४३ धावा दिल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jitendra avhad post mohammad shami viral video on social media rmt

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या