PBKS vs RCB Match HIghlights in marathi: आज धरमशाला येथे होणारा आयपीएल २०२६ चा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. या सामन्यावर अनेक संघांच्या प्लेऑफचं भवितव्य ठरणार आहे. आरसीबीने गेल्या हंगामातील आपला कमालीचा फॉर्म कायम ठेवला आहे आणि ते प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहेत. तर पंजाब किंग्सला शर्यतीत कामय राहायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे, दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार मात्र बदलला आहे.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदारच्या जागी जितेश शर्मा संघाचे नेतृत्त्व करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटीदारला दुखापत झाली असल्यामुळेच तो पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी धरमशालाला गेला नाही. हा सामना जितेश शर्मासाठी खास असणार आहे, कारण या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याला आरसीबीचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. विराट कोहलीचा उत्कृष्ट फॉर्म आणि जितेशचा आक्रमक दृष्टिकोन संघाला आणखी एका विजयाकडे घेऊन जाईल, अशी संघाला आशा असेल.
आरसीबी आणि पंजाब किंग्स सामन्याची नाणेफेक पंजाब किंग्सने जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. नाणेफेकीनंतर कर्णधार जितेश शर्मा म्हणाला, “आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायला आवडलं असतं, पण ही विकेट चांगली दिसतेय आणि पूर्ण ४० षटकं फलंदाजीसाठी मदत करेल असं वाटतं. रजत सध्या शानदार नेतृत्व करत आहे आणि तो हैदराबादमध्ये संघात परतेल अशी अपेक्षा आहे.”
मागील सामन्यात शतक झळकावून विराट कोहलीने पुन्हा एकदा आपला फॉर्म मिळवला असून, धरमशालामध्ये त्याच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा असतील. तर पंजाब किंग्ससाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने सात सामन्यांनंतर अपराजित राहून हंगामाची सुरुवात केली होती, परंतु आता सलग पाच पराभवांमुळे त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, पंजाब किंग्स धरमशालामध्ये आपली गमावलेली लय पुन्हा मिळवेल की आरसीबी बाजी मारत गुणतालिकेत प्लेऑफ क्वालिफायरचा टॅग निश्चित करेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन:
जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, जितेश शर्मा (यष्टीरक्षक/कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन:
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अजमतुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
