Jitesh Sharma Viral Video: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. कारण पावरप्लेमध्येच दिल्लीचे ६ फलंदाज माघारी परतले होते. दिल्ली कॅपिटल्स संघावर ४९ पेक्षाही कमी धावांवर ऑलआऊट होण्याचं संकट होतं. दिल्लीने ५० धावांचा पल्ला गाठताच दिल्लीच्या मैदानावर एकच जल्लोष झाला. यादरम्यान जितेश शर्माने केलेल्या कृतीचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासून दिल्लीचे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले. त्यामुळे दिल्लीचा संघ ३०-४० धावांवर ऑलआऊट होतो की काय, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली. असं झालं असतं, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपलाच रेकॉर्ड मोडून काढला असता. पण अभिषेक पोरेलने ३० धावांची खेळी करून संघाची धावसंख्या ७० पार पोहोचवली. दिल्ली कॅपिटल्सं संघावर ४९ पेक्षाही कमी धावांवर ऑलआऊट होण्याचं संकट ओढवलं होतं. असं झालं असतं, तर सर्वात कमी धावसंख्येचा रेकॉर्ड दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर नोंदवला गेला असता.
एका पाठोपाठ एक विकेट गेल्यानंतर दिल्लीचा संघ कमी धावांवर आटोपण्याचं चित्र होतं. पण अभिषेक पोरेलने षटकार मारून ४९ धावांचा पल्ला गाठला. त्यावेळी दिल्लीच्या ताफ्यात आनंदाचं वातावरण होतं. दिल्लीचे चाहते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना ४९..४९.. वरून डिवचताना दिसून आले. नेमकं त्याचवेळी मैदानावर वादळ आलं होतं. या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा झेंडा उडून मैदानावर आला. त्यावेळी यष्टिरक्षण करत असलेल्या जितेश शर्माने हा झेंडा खाली पडण्याआधीच पकडला आणि खिशात घातला. जितेश शर्माच्या या कृतीचं जोरदार कौतुक होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा डाव अवघ्या ७५ धावांवर आटोपला. दिल्लीचे सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. अभिषेक पॉरेलने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. ७६ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने मिळून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ८१ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवून दिला.
