Joe Root Record In England: गेल्या काही वर्षांत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. जो रूटने क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. सध्या श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये सुरू होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने ८९ धावांची दमदार खेळी केली. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने २६६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव अवघ्या १७६ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून विल जॅक्स चमकला. यासह स्टार फलंदाज जो रूटने ४४ धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं, पण त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

जो रूट हा इंग्लंडमध्ये वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. रूटच्या नावे इंग्लंडमध्ये वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक ४०७४ धावा करण्याची नोंद आहे. याआधी हा रेकॉर्ड इंग्लंडचा माजी कर्णधार ओएन मॉर्गनच्या नावे होता. मॉर्गनने इंग्लंडमध्ये वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ४०६७ धावा केल्या होत्या.

सचिन तेंडुलकरचा हा रेकॉर्ड मोडणं कठीण

या ४४ धावांच्या खेळीसह इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला. तसेच प्रत्येक देशात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने बांगलादेशच्या तमीम इक्बालला मागे टाकलं आहे. तमीम इक्बालने बांगलादेशमध्ये फलंदाजी करताना ४०३४ धावा केल्या होत्या. आता रूटने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आता रूट गेलचा रेकॉर्ड मोडण्याच्या प्रयत्नात असणार आहे. गेलने वेस्ट इंडिजमध्ये फलंदाजी करताना ४२१७ धावा केल्या होत्या. रूटने मॉर्गनचा रेकॉर्ड मोडला असला तरीदेखील सचिनचा हा रेकॉर्ड मोडणं जर कठीणच आहे. सचिनने भारतात फलंदाजी करताना सर्वाधिक ६९७६ धावा करण्याची नोंद आहे. रूटला जर सचिनचा हा रेकॉर्ड मोडून काढायचा असेल, तर त्याला आणखी ३ हजार धावा कराव्या लागणार आहेत. वनडे क्रिकेटमध्ये ३००० धावा करणं मुळीच सोपं नाही. पण रूट या रेकॉर्डच्या जवळपास पोहोचण्याच्या प्रयत्नात नक्कीच असणार आहे.

वनडे क्रिकेटमध्ये एकाच देशात खेळताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर- ६९७६ धावा (भारत)
रिकी पाँटिंग – ५५२१ धावा (ऑस्ट्रेलिया)
जॅक कॅलिस- ५१८६ धावा (दक्षिण आफ्रिका)
कुमार संगकारा- ४७२४ धावा (श्रीलंका)
मार्टीन गप्टिल- ४२८५ धावा (न्यूझीलंड)
ख्रिस गेल- ४२१७ धावा ( वेस्ट इंडिज)
जो रूट- ४०३४ धावा (इंग्लंड)