Joe Root Record: इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने आणखी एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना रूटने ४ तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना अवघ्या २४ धावा केल्या. तरीदेखील त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या सामन्यातील दोन्ही डावात रिकी पाँटिंगची बॅट शांत राहिली. पण तरीदेखील त्याने पाँटिंगचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मायदेशात सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये रूटने पाँटिंगला मागे टाकलं आहे. रूटच्या नावे इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना ७५९४ धावा करण्याची नोंद आहे. याआधी हा रेकॉर्ड रिकी पाँटिंगच्या नावावर होता. पाँटिंगने ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना ७५७८ धावा केल्या होत्या. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावे भारतात फलंदाजी करताना ७२१६ धावा करण्याची नोंद आहे. तसेच श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने आणि दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस या यादीत पाचव्या स्थानी आहे.

जो रूटने गेल्या काही वर्षांत अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. पण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानच्या ताफ्यात अनुभवी गोलंदाज नाहीत, तरीदेखील रूट या गोलंदाजांचा सामना करताना संघर्ष करताना दिसून येतोय. गेल्या ३ डावात फलंदाजी करताना त्याला अवघ्या ९४ धावा करता आल्या आहेत. या मालिकेसाठी त्याची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्णधाराने पुढाकार घेऊन धावा करणंही तितकंच गरजेचं आहे.

घरच्या मैदानावर खेळताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

जो रूट – ७५९४ धावा, इंग्लंड
रिकी पाँटिंग- ७५७८ धावा, ऑस्ट्रेलिया
सचिन तेंडुलकर- ७२१६ धावा, भारत
महेला जयवर्धने- ७१६७ धावा, श्रीलंका
जॅक कॅलिस- ७०३५ धावा, दक्षिण आफ्रिका

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव अवघ्या २९० धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जेमी स्मिथने सर्वाधिक ६१ तर जॉर्डन कॉक्सने ५५ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव अवघ्या ११० धावांवर आटोपला. यासह इंग्लंडने पाकिस्तानवर मोठी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने ८१ धावा केल्या असून, २५० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.