Joe Root breaks Sachin Tendulkar’s world record : बॅझबॉल शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी टी-२० शैलीत ८ विकेट्सनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रूट शानदार खेळी साकारत सचिन तेंडुलकरला मागे टाकत विश्वविक्रम केला आहे. त्याने एकाच सामन्यात तीन महान खेळाडूंना मागे टाकले. जो रूट आता कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध कॅसचर्चमध्ये १५ चेंडूत २३ धावांची तुफानी खेळी खेळली.

यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ, त्याच्या संघाचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक आणि क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. कॅसचर्च कसोटीपूर्वी, चौथ्या डावातील त्याच्या कसोटी धावांची संख्या १६०७ होती, जी या सामन्यानंतर १६३० झाली आहे. या सामन्यात त्याने पाच धावा करताच ग्रॅम स्मिथ आणि ॲलिस्टर कुकला मागे टाकले. यानंतर १९ धावा करताच तो कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमधील या कामगिरीची नोंद सचिन तेंडुलकरच्या नावावर होती. चौथ्या डावात त्याने १६२५ धावा केल्या होत्या, मात्र कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात जो रूटच्या धावांची संख्या १६३० झाली आहे. त्याच वेळी, ग्रॅमी स्मिथ आणि कुक यांनी आपापल्या संघांसाठी प्रत्येकी १६११-१६११ धावा केल्या आहेत, तर शिवनारायण चंद्रपॉलने १५८० धावा केल्या आहेत.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Bhaiyyaji Joshi of RSS said India should become super nation not superpower
भारत सुपरपाॅवर नव्हे, सुपरराष्ट्र होण्याची आवश्यकता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
Nitish Reddy climbs Tirupati Temple stairs on knees After Stunning Test Debut & Century vs Australia
Nitish Reddy: नितीश रेड्डी गुडघ्यावर चढला तिरूपतीच्या पायऱ्या, ऑस्ट्रेलियातील शतकानंतर देवाचे असे मानले आभार; VIDEO व्हायरल
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
fti former president gajendra chauhan s
“नागपूरने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला, आता पंतप्रधान देणार”, ‘या’ अभिनेत्याच्या वक्तव्याने…

कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –

जो रुट – १६३० धावा
सचिन तेंडुलकर -१६२५ धावा
अॅलिस्टर कुक – १६११ धावा
शिवनारायण चंद्रपॉल – १५८० धावा

हेही वाचा – सरावाचा पहिला दिवस वाया,पावसाचा व्यत्यय; गुलाबी चेंडूशी जुळवून घेण्यास केवळ ५०५० षटकेच

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केन विल्यमसनच्या ९३ धावांच्या जोरावर किवी संघाचा डाव ३४८ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात ४९९ धावा केल्या आणि १५१ धावांची आघाडी घेतली. हॅरी ब्रूकने १७१ धावांची जबरदस्त खेळी केली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडची धावसंख्या कशीतरी २५४ धावांपर्यंत पोहोचली.

हेही वाचा – IND vs PAK : पाकिस्तानने युवा टीम इंडियाला केलं चीतपट, शाहजेब खानने साकारली शतकी खेळी

वेगाने धावा काढण्याचा प्रयत्नात दुसऱ्याच षटकात जॅक क्रॉऊली बाद झाला, पण त्यानंतर बेन डकेट आणि जेकब बेथलेने आक्रमक शॉट्स खेळले. यानंतर डकेट आठव्या षटकात २७ धावा काढून बाद झाला, त्याच षटकात नवा फलंदाज जो रूटने शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. जेकब बेथलेने पहिले कसोटी अर्धशतक अवघ्या ३७ चेंडूत झळकावून इंग्लंडला १२.४ षटकांत १०४ धावांचे लक्ष्य गाठून दिले. जो रूट १५ चेंडूत २३ धावा करून नाबाद परतला.

Story img Loader