इंग्लंडचा नवोदित गोलंदाज जोफ्रा आर्चर हा त्याच्या मैदानावरील खेळाबरोबरच ट्विटसाठीही लोकप्रिय आहे. अनेकदा एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्याने केलेले जुने ट्विट व्हायरल होत असतात. त्याचे काही भारतीय चाहते तर मजेत ‘आर्चर ही भगवान है’ असंही म्हणतात. आपल्या ट्विटमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या आर्चरने पुन्हा एकदा एक दोन शब्दांचे ट्विट केले आहे आणि अर्थात हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्चरने २ ऑक्टोबर रोजी केलेल्या ट्विटमध्ये केवळ दोन शब्द लिहिले आहेत. ‘वन डे’ असं हे ट्विट आहे. या ट्विटचा काही संबंध चाहत्यांना लागत नाहीय कारण त्याने हे ट्विट कशासंदर्भात आहे याचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

आता मागील काही महिन्यांमध्ये डोकावून पाहिल्यास आर्चरच्या काही वर्षांपूर्वीच्या ट्विटचा संबंध नेटकऱ्यांनी आता जोडला आहे. म्हणूनच आर्चरने असं असंबंध ट्विट केलं अन् नेटकरी शांत बसले असं शक्यच नाही. त्यामुळेच त्याच्या या ट्विटचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहेत.

बुकमार्क केलं

२०२५ मध्ये काय संबंध आहे याचा हिशेब लावण्याचा प्रयत्न

चार वर्षांनंतर काय अर्थ असेल याचा

२०२३ चं ट्विट

२ ते ३ वर्षात समजेल काय ते

हा असू शकतो अर्थ

लिहून घेतो…

सहा वर्षात समजेलच कशाबद्दल आहे हे

भविष्यवाणी

हे काय

बापरे काय होणार

आर्चरच्या ट्विटवरुन अशाप्रकारे नेटकऱ्यांनी सैराट होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये भारताने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही आर्चरचे एक जुने ट्विट चांगलेच चर्चेत आले होते. या ट्विटमध्ये त्याने “सध्याच्या दिवसांमध्ये ३७० अजिबात सुरक्षित नाही”, असे म्हटले होते. त्याआधी जुलै महिन्यात विश्वचषकाच्या अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या अंतिम सामन्यात इंग्लंड जिंकल्यानंतर सुपर ओव्हर टाकणाऱ्या जोफ्रा आर्चरचेच ही ट्विट व्हायरल झालेले. त्याने केलेल्या ट्विटमध्ये ६ चेंडूंत १६ धावा , लॉर्ड्सवर जाण्याची इच्छा, सुपर ओव्हर टाकायलाही आवडेल असे काही ट्विट होते. त्यामुळे नेटकरी जोफ्रा आर्चरला ज्योतिषाचार्य असल्याचे म्हटले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jofra archer drops a 2 word tweet fans think it is another futuristic tweet scsg
First published on: 04-10-2019 at 09:51 IST