IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा बिनीचा शिलेदार जायबंदी, ३ महिने खेळू शकणार नाही क्रिकेट

उजव्या हाताच्या कोपऱ्याला झाली दुखापत

इंग्लंडचा आघाडीचा क्रिकेटपटू जोफ्रा आर्चर आगामी आयपीएलच्या हंगामात खेळू शकणार नाहीये. उजव्या हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर पुढचे काही दिवस क्रिकेट खेळू शकणार नाहीये. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आर्चरच्या दुखापतीबद्दल माहिती दिली असून तो इंग्लंडच्या आगामी श्रीलंका दौऱ्यातही खेळणार नाहीये. जोफ्राला झालेली दुखापत इतकी गंभीर आहे की पुढील ३ महिने तो खेळू शकणार नसल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यानच जोफ्राला सर्वात प्रथम दुखापत जाणवायला लागली होती. यानंतर वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याची ही दुखापत वाढल्याचं समोर आलं. यानंतर पुढील ३ महिने आर्चर उपचारांसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या डॉक्टरांची मदत घेणार आहे. आतापर्यंत आर्चरने इंग्लंडचं ७ कसोटी आणि १४ वन-डे सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आगामी आयपीएल हंगामासाठी जोफ्रा आर्चरला राजस्थान रॉयल्स संघाने कायम राखलं होतं. आतापर्यंत आर्चरने राजस्थानकडून २१ सामने खेळले असून यात त्याच्या नावावर २६ बळी जमा आहे. यासोबत अनेकदा फलंदाजीतही त्याने आपली चमक दाखवली आहे. त्यामुळे आगामी काळात राजस्थान रॉयल्स आर्चर ऐवजी कोणत्या खेळाडूला संघात स्थान देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jofra archer ruled out of indian premier league due to stress fracture psd

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या