भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ साली टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकात फायनलचा हिरो जोगिंदर शर्मा ठरला होता. या जोगिंदर शर्माने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शुक्रवारी (३ फेब्रुवारी) ३९ वर्षीय जोगिंदर शर्मा यांनी ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरियाणातील रोहतक येथून आलेल्या जोगिंदर शर्माने भारतासाठी फक्त ४ वनडे आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्व टी-२० सामने केवळ विश्वचषकात खेळले आणि इतिहास रचला. २००४ मध्ये त्याने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २००७ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.

जोगिंदर शर्मा सध्या हरियाणा पोलिसमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहे. काही काळापूर्वी तो हरियाणाकडून रणजी ट्रॉफीही खेळत होता.
जोगिंदर शर्माने ट्विटरवर त्यांचे पत्र शेअर केले आहे, जे त्यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांना पाठवले आहे. त्याचबरोबर निवृत्तीची घोषणा केली आहे. जोगिंदर शर्माने लिहिले, मी बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज आणि हरियाणा सरकारचे आभार मानतो. जोगिंदर शर्माने त्याचे चाहते, कुटुंब, मित्रांचे आभार मानले, ज्यांनी त्याच्या कारकिर्दीतील चढ-उतारांवर त्याला साथ दिली. अशा पद्धतीने जोगिंदर शर्माने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

जोगिंदर शर्माचे ट्विट

जोगिंदर शर्माचे ते ऐतिहासिक षटक –

त्या फायनलच्या शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची गरज होती. कर्णधार धोनीने अगदी नवशिक्या गोलंदाज जोगिंदर शर्माकडे चेंडू दिला. मिसबाह-उल-हक क्रीजवर असल्यामुळे भारतीय चाहत्यांनी श्वास रोखून धरला होता. सर्वत्र प्रश्न निर्माण होऊ लागले – जोगिंदरला गोलंदाजी का दिली गेली..?

आयसीसी ट्विट

शेवटचे षटक: जोगिंदर विरुद्ध मिसबाह –

अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १३ धावांची गरज होती.
१. जोगिंदरने पहिला चेंडू वाईड टाकला.
वाइडऐवजी टाकलेला पुढचा चेंडू मिसबाह खेळताना चुकला. त्यामुळे एकही धाव मिळाली नाही.
२. यानंतर जोगिंदरने फुलटॉस फेकला, ज्यावर मिसबाहने षटकार मारून पाकिस्तानच्या आशा पुन्हा जागृत केल्या.
३. मिसबाहने स्कूप शॉट खेळला आणि चेंडू शॉर्ट फाईन-लेगच्या दिशेने गेला. जो श्रीसंतने झेलला आणि टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. भारताने पहिला टी-२० विश्वचषक अवघ्या ५ धावांनी जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joginder sharma who led the indian team to win the t20 world cup in 2007 retired from international cricket vbm
First published on: 03-02-2023 at 14:08 IST