John Campbell Century: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात जॉन कॅम्पबेलने दमदार अर्धशतकी खेळी केली होती. मालिकेतील दुसरा सामना बारसापरा स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पण हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण वेस्ट इंडिजकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या जॉन कॅम्पबेलने या सामन्यात दमदार शतक झळकावलं आणि वेस्ट इंडिजला वादळी सुरूवात करून दिली. या शतकी खेळीच्या बळावर त्याने एक खास रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलं आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या जस्टीन ग्रीव्ह्सने १०१ धावांची सलामी दिली होती. या सामन्यात जस्टीन ग्रीव्ह्सची जागा जॉन कॅम्पबेलने भरून काढली. त्याने या डावात अवघ्या २८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याच्याकडे वेगवा शतक झळकावण्याची संधी होती. पण शतकाच्या जवळ येताना त्याने गिअर कमी केला आणि एकेरी दुहेरी धावा घ्यायला सुरूवात केली. दरम्यान त्याने ६५ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. हे वेस्ट इंडिजसाठी वनडे क्रिकेटमध्ये झळकावलेलं पाचवं सर्वात वेगवान शतक आहे. तसेच भारताविरुद्ध खेळताना वेस्ट इंडिजच्या कुठल्याही फलंदाजाने झळकावलेलं हे सर्वात वेगवान शतक आहे.
वेस्ट इंडिजसाठी पाचवं सर्वात वेगवान शतक
वेस्ट इंडिजसाठी सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. ब्रायन लारा यांनी ४५ चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. तर या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ख्रिस गेलने ५५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं होतं. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या एविन लुईसने ६१ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं होतं. तर निकोलस पूरनने ६३ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं होतं. आता ६५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करताच जॉन कॅम्पबेल हा वेस्ट इंडिजसाठी सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
वेस्ट इंडिजकडून वनडेमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज
४५ चेंडू – ब्रायन लारा (वि. बांगलादेश, १९९९)
५५ चेंडू – ख्रिस गेल (वि. इंग्लंड, २०१९)
६१ चेंडू – एव्हिन लुईस (वि. श्रीलंका, २०२४)
६३ चेंडू – निकोलस पूरन (वि. नेदरलँड्स, २०२३)
६५ चेंडू – जॉन कॅम्पबेल (वि. भारत, २०२६)*
६६ चेंडू – शाई होप (वि. न्यूझीलंड, २०२५)
