John Campbell & Justin Greaves Record: वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतपुरममध्ये सुरू आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. वेस्ट इंडिजकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या सलामीवीर जस्टीन ग्रीव्ह्स आणि जॉन कॅम्पबेल यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची विक्रमी भागीदारी केली. २००२ नंतर पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं आहे.
जस्टीन ग्रीव्ह्स आणि जॉन कॅम्पबेल यांनी डावाची सुरूवात करताना दमदार सुरूवात केली. दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय संघाविरुद्ध केलेली तिसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. भारताविरुद्ध सर्वात मोठी भागीदारी करण्याच्या रेकॉर्डमध्ये जस्टीन ग्रीव्ह्स आणि जॉन कॅम्पबेलच्या जोडीने ख्रिस गेल आणि हिंड्सच्या जोडीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. २००२ मध्ये वडोदरा येथे झालेल्या वनडे सामन्यात या जोडीने १३२ धावांची भागीदारी केली होती. तर १९८८ मध्ये गॉर्डन ग्रीनीज आणि फिल सिमन्सने तिरूवनंतपुरमच्या मैदानावर खेळताना १६४ धावांची भागीदारी केली होती. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या गॉर्डन ग्रीनीज आणि डेसमंड हेन्सच्या जोडीने १९८३ मध्ये पहिल्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली होती.
भारतीय संघाविरुद्ध खेळताना पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करणारे वेस्ट इंडिजचे सलामीवीर फलंदाज
गॉर्डन ग्रीनीज – फिल सिमन्स- १६४ धावा , तिरुवनंतपुरम,१९८८
गॉर्डन ग्रीनीज – डेसमंड हेन्स -१४९ धावा, इंदूर, १९८३
जॉन कॅम्पबेल – जस्टिन ग्रीव्स- १३५ धावा,तिरुवनंतपुरम, २०२६*
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), नमन धीर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव आणि
प्रसिद्ध कृष्णा
वेस्ट इंडिज: जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्ह्ज, केसी कार्टी, शाय होप (यष्टीरक्षक/कर्णधार), अमीर जांगू, ज्वेल अँड्र्यू, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडन सील्स
