Johnson Charles breaks Chris Gayle's record: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंच्युरियनमध्ये दुसरा टी-२० सामना पार पडला. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ६ गडी राखून जिंकला. तत्पुर्वी जॉन्सन चार्ल्सने झंझावाती शतक ठोकत इतिहास रचला. वेस्ट इंडिजसाठी सर्वात जलद टी-२० शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत अनुभवी खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. चार्ल्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३९ चेंडूत शतक ठोकले, तर ख्रिस गेलने ४७ चेंडूत वेस्ट इंडिजसाठी सर्वात वेगवान शतक ठोकले होते. जॉन्सन चार्ल्सने गेलला मागे टाकले - सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात गेलेल्या सामन्यात जॉन्सन चार्ल्सने काइल मेयर्ससह दुसऱ्या विकेटसाठी १३५ धावांची मोठी भागीदारी केली. चार्ल्सने ३९ चेंडूत शतक पूर्ण केले आणि ४६ चेंडूत ११८ धावा केल्या. ११८ धावांसह, त्याने सर्वात मोठे शतक करण्याच्या बाबतीत गेललाही मागे सोडले, गेलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११७ धावा केल्या होत्या. चार्ल्सने शतकासह हे विक्रम मोडीत काढले - हेही वाचा - IPL 2023 सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने हातावर काढला नवीन टॅटू, बंगळुरूला पोहोचल्यानंतर फोटो व्हायरल एकूण सर्व टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याबाबत बोलायचे झाले, तर जॉन्सन चार्ल्स आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. डेव्हिड मिलर, रोहित शर्मा, एस विक्रमसेकेरा यांच्यानंतर आता जॉन्सन चार्ल्सचे नाव आहे. वेस्ट इंडिजसाठी एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत चार्ल्सने ख्रिस गेलचीही बरोबरी केली आहे. पहिल्या क्रमांकावर एविन लुईस आहे, ज्याने एका डावात १२ षटकार ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे खेळाडू - ३५ – डेव्हिड मिलर, विरुद्ध बांगलादेश, पॉचेफस्ट्रूम, २०१७३५ – रोहित शर्मा शर्मा, भारत विरुद्ध श्रीलंका, इंदूर, २०१७३५ – एस विक्रमसेकेरा, झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, इल्फोव्ह काउंटी, २०१९३९ – जॉन्सन चार्ल्स, वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, २०२३३९ – एस पेरियालवार, रोमानिया विरुद्ध तुर्की, इल्फोव्ह काउंटी, २०१९३९ – झीशान कुकीखेल, हंगेरी विरुद्ध ऑस्ट्रिया, लोअर ऑस्ट्रिया, २०२२ वेस्ट इंडिजसाठी T20I डावात सर्वाधिक षटकार - १२ – एविन लुईस विरुद्ध भारत, किंग्स्टन, २०१७११ – ख्रिस गेल विरुद्ध इंग्लंड, मुंबई, २०१६११- जॉन्सन चार्ल्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, आज१० – ख्रिस गेल विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २००७ हेही वाचा - WPL 2023 Final MI vs DC: रोहित शर्मासह ‘या’ खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या महिला संघाला फायनलसाठी दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO टी-२० मध्ये वेस्ट इंडिजसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या - १२५* (६२) – एविन लुईस विरुद्ध इंडिया किंग्स्टन, २०१७११८* (४५) – जॉन्सन चार्ल्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, आज११७ (५७) – ख्रिस गेल विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २००७१०७ (५३) – रोव्हमन पॉवेल विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाउन, २००२१००* (४८) – ख्रिस गेल विरुद्ध भारत, मुंबई, २०१६१०० (४९) – एविन लुईस विरुद्ध भारत, लॉडरहिल, २०१६