शेवटच्या चेंडू पर्यंत उत्सूकता शिगेला पोहोचलेल्या सामण्यात चॅम्पियन्स भारताला यजमान वेस्टइंडिजकडून परभव पत्करावा लागला. इंडिजला त्यांच्या  घरच्या मैदानावर पराभूत करण्याची संधी भारतीय संघाजवळ होती. मात्र, वेस्ट इंडिजच्या शेवटच्या जोडीने धैर्याने खेळ करत आपल्या संघाला विजया पर्यंत पोहचवले. इशांत शर्माने आक्रमक सॅमिला बाद करून सामण्याचा रंग पालटला होता. ४७ व्या षटकामध्ये वेस्टइंडिजला जिंकण्यासाठी ६ धावांची आवश्यकता होती. केवळ एक विकेट शिल्लक असल्याच्या प्रचंड दबावामध्ये इंडिजच्या शेवटच्या जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी सामण्याच्या सुरूवातीलाच उमेश यादवने गेलला सुरेश रैनाच्या मदतीने झेल बाद करत वेस्ट इंडिजला जोरदार धक्का दिला. वैयक्तीक दुसऱयाच षटकात ७ धावा देत यादवने दोन बळी मिळवून भारताची स्थिती मजबूत केली होती. भुवणेश्वर कुमारने दुसऱया बाजूने योग्य मारा करत कॅरेबियन झंजावात रोखून धरला. कुमारच्या सुरूवातीच्या षटकामधे विंडिज फलंदाजांनी तीन चौकार कुटले. मात्र, संयमाने गोलंदाजी करत कुमारने कॅरेबियन  फलंदाजांना थोपवून धरले होते. धोनीच्या अनुपस्थीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी इंडिजला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेस्ट इंडिज संघाने  देखील चांगली खेळी केली. जॉन्सन चार्लस मॅन ऑफ द मॅच ठरला. चार्लसने १०० चेंडूत ९७ धावा केल्या.    
तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करत सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर ५० षटकांत ७ बाद २२९ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली होती. वेस्ट इंडिजचा कर्णधार ड्वेन ब्राव्हो आणि वेगवान गोलंदाज रवी रामपॉल दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकले नाहीत. त्यामुळे किरॉन पोलार्डकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. पोलार्डने नाणेफेक जिंकताच भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत सातत्याने दमदार सलामी नोंदवणाऱ्या शिखर धवन आणि रोहित शर्मा या भारताच्या सलामीच्या जोडीला फक्त २६ धावा काढता आल्या. केमार रोचने स्वत:च्याच गोलंदाजीवर धवनचा (११) झेल घेत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर विराट कोहली (११)चा अडसर डॅरेन सॅमीने दूर केला. त्यानंतर रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी रचून भारताला शतकासमीप पोहोचवले. परंतु मार्लन सॅम्युअल्सने कार्तिक (२३)ला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर ८९ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा केल्या. सॅमीने त्याला तंबूची वाट दाखवली. मग सुरेश रैना (४४) आणि कप्तान महेंद्रसिंग धोनी (२७) यांनी पाचव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. केमार रोच, टिनो बेस्ट आणि सॅमी यांनी प्रत्येकी बळी घेतले.

धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. चार्ल्स गो. सॅमी ६०, शिखर धवन झे. आणि गो. रोच ११, विराट कोहली झे. गेल गो. सॅमी ११, दिनेश कार्तिक झे. आणि गो. सॅम्युअल्स २३, सुरेश रैना झे. रामदिन गो. रोच ४४, महेंद्रसिंग धोनी त्रिफळा गो. बेस्ट २७, रवींद्र जडेजा त्रिफळा गो. बेस्ट १७, आर. अश्विन नाबाद ५ , भुवनेश्वर कुमार नाबाद ११, अवांतर : २०, एकूण ५० षटकांत ७ बाद २२९
बादक्रम : १-२५, २-३९, ३-९८, ४-१२४, ५-१८२, ६-१९७, ७-२१२
गोलंदाजी : केमार रोच १०-२-४१-२, टिनो बेस्ट १०-०-५४-२, डॅरेन सॅमी १०-३-४१-२, किरॉन पोलार्ड १-०-८-०, सुनील नरिन १०-०-५६-०, मार्लन सॅम्युअल्स ९-१-२०-१
वेस्टइंडिज: जॉन्सन चार्लस ९७, गेल ११, ब्रावो ५५, सॅमी २९, स्मिथ ०, सॅम्युअल्स १, पोलार्ड ४, रामदिन ४, रोआच १४, सुनिल नरिने ५, बेस्ट ३   
अवांतर: ७, एकूण ४७.४ षटकांत ९ बाद २३०
बादक्रम: १-१३, २-२५, ३-२६, ४-१४२, ५-१५५, ६-१६१, ७-१९७, ८-२११, ९-२२०
गोलंदाजी: भुवणेश्वर कुमार ७-१३६-१, उमेश यादव ९.४-२-४३-३, रविंद्र जडेजा १०-१-५०-०, इशांत शर्मा ९-०-५१-२, आर. अश्विन १०-०-४४-२ सुरेश रैना २-१-४-१