जोहोर बारु : भारतीय कुमार हॉकी संघाने जोहोर चषक स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात गतविजेत्या ग्रेट ब्रिटनला ५-५ असे बरोबरीत रोखले. या कामगिरीचा भारतीय संघाला फायदा झाला. अन्य सामन्यात जपान आणि दक्षिण आफ्रिका या संघांना विजय मिळविण्यात अपयश आल्याने भारताने अंतिम फेरी गाठली.

ब्रिटनविरुद्ध भारताकडून श्रद्धानंद तिवारीने (५६ आणि ५८वे मिनिट) दोन, तर पूवन्नाल सी. बी. (सातवे मि.), अमनदीप (५०वे मि.) व अराजित सिंग हुंडाल (५३वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. ग्रेट ब्रिटनकडून मॅक्स अँडरसनने (पहिले आणि ४०वे मि.), जामी गोल्डन (५४ आणि ५६वे मि.)  हॅरिसन स्टोन (४२वे मि.) यांनी गोल केले.