Josh Inglis Batting: आयपीएल २०२६ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. चेपॉकच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाकडून जोस इंग्लिसने वादळी सुरुवात करून दिली. त्याने अवघ्या ३३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. यादरम्यान त्याने अंशूल कंबोज आणि मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर २ खणखणीत शॉट खेचले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण मिळालं. डावाची सुरुवात करताना जोस इंग्लिस चेन्नईचा गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने अवघ्या ३३ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार खेचले. त्याच्याकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण हे शतक अवघ्या १५ धावांनी हुकलं. पण त्याने पावरप्लेच्या आधीच संघाची धावसंख्या ७० धावांच्या पार पोहोचवली होती.
जोस इंग्लिसचे खणखणीत षटकार
जोस इंग्लिस आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. या डावातही त्याची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याने यष्टिरक्षण करत असलेल्या संजू सॅमसनच्या डोक्यावरून २ षटकार खेचले. तर झाले असे की, चेन्नईकडून दुसरे षटक टाकण्यासाठी मुकेश चौधरी गोलंदाजीला आला. या षटकातील पाचवा चेंडू त्याने संजू सॅमसनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर पोहोचवला. त्यानंतर तिसरे षटक टाकण्यासाठी अंशूल कंबोज गोलंदाजीला आला. या षटकातील पाचवा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर पोहोचवला. या षटकारांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेईंग इलेव्हन):
मिचेल मार्श, जोस इंग्लिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), एडन मार्करम, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, मोहम्मद शमी, दिग्नेश सिंग राठी, प्रिन्स यादव.
चेन्नई सुपर किंग्स (प्लेईंग इलेव्हन):
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्वील पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, अंशुल कंबोज, नूर अहमद, मुकेश चौधरी
