पीटीआय, सालालाह (ओमान) : कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत अखेपर्यंत चुरशीने खेळला गेलेला भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यामधील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. अ-गटात समाविष्ट असलेले हे दोनही संघ तीन सामन्यांनंतर अपराजित आहेत.
या सामन्यात शारदानंद तिवारीने २४व्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी नियंत्रित खेळ करत सामन्यावरील पकड निसटू दिली नव्हती. मात्र, ४४व्या मिनिटाला बशरत अलीने पाकिस्तानला बरोबरी साधून दिली. या सामन्यातील बरोबरीनंतर भारत आणि पाकिस्तान या दोनही संघांचे सात गुण झाले. मात्र, सरस गोलफरकाच्या आधारावर पाकिस्तान अव्वल आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अन्य एका सामन्यात जपानने तैवानचा १०-१ असा पराभव करून गटात तिसरे स्थान मिळवले.
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.