scorecardresearch

कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी : भारतीय नेमबाजांना चार सुवर्ण

१० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरी, शिवा नरवाल आणि सरबजोत सिंग या त्रिकुटाने सुवर्णपदक जिंकले.

मनू भाकर

नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांनी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतील दमदार कामगिरी सुरू ठेवताना शुक्रवारी चार सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या सांघिक गटात रुद्राक्ष पाटील, पार्थ मखिजा आणि उमामहेश माद्दिनेनी यांनी, तर १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सौरभ चौधरी, शिवा नरवाल आणि सरबजोत सिंग या त्रिकुटाने सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकर, पलक आणि ईशा सिंग यांनी, तर महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात आर्या बोरसे, झीना खिट्टा आणि रमिता यांनी सुवर्णपदक आपल्या नावे केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Junior world cup indian shooters win four more gold medals zws

ताज्या बातम्या