युव्हेंटसला या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नसली तरी मोसमाअखेरीस त्यांनी अ‍ॅटलांटाचा २-१ असा पराभव करत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

युव्हेंटसचे हे इटालियन चषकाचे १४वे तर अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे पहिले जेतेपद ठरले. दुजान कुलुसेवस्की याने ३१व्या मिनिटाला युव्हेंटसचे खाते खोलल्यानंतर अ‍ॅटलांटाने रस्लन मलिनोवस्की (४१व्या मिनिटाला) याच्या गोलमुळे सामन्यात बरोबरी साधली. मात्र फेडेरिको चिएसा याने ७३व्या मिनिटाला निर्णायक गोल करत युव्हेंटसला जेतेपद मिळवून दिले. मोसमातील दुसरे जेतेपद पटकावल्यानंतर आंद्रिया पिलरे यांनी युव्हेंटसच्या प्रशिक्षकपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली.

इटालियन चषक फुटबॉल स्पर्धा

फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धा

पॅरिस सेंट-जर्मेन अजिंक्य

पॅरिस : किलियन एम्बाप्पेच्या शानदार कामगिरीमुळे पॅरिस सेंट-जर्मेनने मोनॅकोचा २-० असा पराभव करत फ्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच राखले. त्यांचे हे १४वे जेतेपद ठरले. याआधी अंतिम फेरीत दोन्ही संघ दोन वेळा आमने-सामने आले होते. २०१०मध्ये पॅरिस सेंट-जर्मेनने

१-० असा विजय मिळवला होता तर १९८५मध्ये मोनॅकोने १-० अशी बाजी मारली होती.