scorecardresearch

६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान महाराष्ट्राला

AKIF कडून आगामी स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर

६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान महाराष्ट्राला
२०१७ साली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारा महाराष्ट्राचा संघ (संग्रहीत छायाचित्र)

प्रो-कबड्डीमुळे भारतात कबड्डीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. क्रिकेटनंतर देशात सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असलेला खेळ म्हणून कबड्डीने आपली जागा निर्माण केली आहे. AKIF (Amature Kabaddi Federation of India) ने आगामी स्पर्धांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकात ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान महाराष्ट्राला देण्यात आलेला असून, फेडरेशन चषक हा हिमाचल प्रदेशमध्ये भरवला जाणार आहे.

याचसोबत प्रो-कबड्डी लीग, कबड्डी विश्वचषक, बीच कबड्डी अजिंक्यपद यांसारख्या अनेक महत्वाच्या स्पर्धांची वेळापत्रक आज कबड्डी फेडरेशनने जाहीर केली आहेत. त्यामुळे २०१७ साली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारा महाराष्ट्राचा संघ यंदाच्या वर्षात आपल्या घरच्या मैदानावर विजेतेपद राखतो का याकडे सर्वांचं लक्ष असणारआहे.

६६ वी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष)

आयोजन – महाराष्ट्र कबड्डी फेडरेशन
ठिकाण व तारीख अद्याप ठरलेली नाही

——————————————————

६६ वी राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा (महिला)
आयोजन – आंध्र कबड्डी असोसिएशन
ठिकाण – कुरनूल
तारीख – १९ नोव्हेंबर २०१८ ते २३ नोव्हेंबर २०१८

——————————————————

४ था सिनीअर फेडरेशन चषक
आयोजन – हिमाचल प्रदेश कबड्डी असोसिएशन
ठिकाण – शिमला
तारीख – अद्याप ठरलेली नाही

——————————————————-

११ वी बीच कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा (महिला-पुरुष)
आयोजन – उत्तराखंड कबड्डी असोसिएशन
ठिकाण – हरिद्वार
तारीख – अद्याप ठरलेली नाही

——————————————————

प्रो-कबड्डी सहावा हंगाम
आयोजन – मार्शल स्पोर्ट्स
ठिकाणी – १२ शहरांमध्ये खेळवले जाणार सामने
तारीख – १९ ऑक्टोबर २०१८ ते २० जानेवारी २०१९

——————————————————

कबड्डी विश्वचषक २०१९
आयोजन – आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन
ठिकाण – अद्याप निश्चीत नाही
तारीख – फेब्रुवारी – मार्च २०१९

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या